मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोले लगावले (CM Uddhav Thackeray Saamana interview). देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील आमदार फंड दिल्लीत दिला आहे. ते सर्व गोष्टी दिल्लीतच करत आहेत. त्यांना दिल्लीचीच चिंता आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या दिल्ली भेटीला कोपरखळी लगावली. यावेळी त्यांनी ही वेळ राजकारण करण्याची नसून एकदिलाने काम करण्याची असल्याचंही म्हटलं.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्लीत जाऊन आल्याची आठवण करुन दिली. यावर उद्धव ठाकरे यांनी ते दिल्लीतील कोरोनाची पाहणी करण्यासाठी गेले असतील असं म्हटलं. तसेच ते सध्या प्रत्येक गोष्ट दिल्लीत करत आहेत. त्यांनी महाराष्ट्राचा आमदाराकीचा फंडही दिल्लीतच दिल्याचं म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला.
“विरोधक विमानाने न जाता बैलगाडीतून का जात नाही?”
उद्धव ठाकरे म्हणाले, “तंत्रज्ञान उपलब्ध असून उपयोग न करणं दुर्भाग्यपूर्ण आहे. मी घराबाहेर पडत नाही, असा आरोप करणारे विमानातून न जाता बैलगाडीतून का जात नाही. जर तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा नाही, तर मग शोध का लावतात?”
“आता तंत्रज्ञान प्रचंड विकसित आहे. कोरोनाच्या संसर्गाचाही धोका आहे. त्यामुळे मंत्रालयही बंद आहे. काम करण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही. मी घरात बसूनही राज्य हाकता येतं. मी घरातून निर्णय घेत आहे. प्रत्यक्ष भेटीमध्ये फक्त एकाच ठिकाणी जाता येते, आता एकाचवेळी अनेक ठिकाणी जात आहे, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
“जनता माझ्या सोबत असल्याने मला कोणताही ताण-तणाव नाही”
उद्धव ठाकरे म्हणाले, “मी जनतेशी माझा संबंध दुरावू दिला नाही. जनता माझ्या सोबत असल्याने मला कोणताही ताण-तणाव नाही. जनतेचा माझ्यावर आशिर्वाद माझ्यावर आहे. त्यामुळे मला कुठलीही चिंता नाही. मी जनतेच्या आरोग्याची काळजी करत काम करत आहे. मी मुख्यमंत्री झालो आणि जागतिक आणीबाणीच आली. कोरोनाबरोबर जगायला सगळ्यांनीच शिकायला हवे.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे :
सध्या विरोधी पक्षनेतेपदाचे दिवस धुमधडाक्याने साजरे होत आहेत. नैसर्गिक आपत्ती येतात, जातातही. कोरोनाचं तसं नाही. कोरोनाचं युद्ध हे खऱ्या अर्थाने विश्वयुद्ध आहे. लॉकडाऊन उठवलेल्या देशांनी पुन्हा लॉकडाऊन लावले. महाराष्ट्रात सैन्य बोलावण्याची वेळ कधीच आली नाही. महाराष्ट्रानेही चीनप्रमाणे 15-20 दिवसांत हॉस्पिटल्स उभारले आहेत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या :
हिंमत असेल तर सरकार पाडा” मुख्यमंत्र्यांचं भाजपला आव्हान, फडणवीसांनाही टोला
Uddhav Thackeray Interview | शरद पवारांनंतर आता संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंशी ‘सामना’
फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते, त्यांना काही माहित नाही : शरद पवार
CM Uddhav Thackeray Saamana interview