मुंबई : मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचा वार्षिक पुरस्कार सोहळा आज (5 फेब्रुवारी) पार (CM uddhav Thackeray speech) पडला. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची गंभीर दखल घेत आरोपींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहे.
“कॅबिनेटमध्ये महिलांवरील अत्याचार कसे थांबवायचे? काय करायचं? तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांनी कायदे केले. तो कायदा आणायचा का? नेमका तो कायदा काय कसा आणायचा? याबाबत अभ्यास सुरु आहे.”
“मात्र आम्ही सर्व पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या आहेत की, महिलांवरील अत्याचार या सुसंस्कृत महाराष्ट्रात अजिबात सहन केले जाणार नाही. जे कोणी आरोपी असतील त्यांना उचला, आणा, फटकावायचं तर फटकवा आणि तातडीने त्यांच्यावर केस दाखल करा. तसेच त्यांना लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे हा या सरकारच आग्रह आणि निग्रह आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“आता खिळे जुळण्याचा काळ गेला आहे. आता खिळे मारण्याचा काळ सुरु झाला आहे. विरोधकांनाही आता खात्री पटली असेल की आता सर्व कठीण आहे,” अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरेंनी (CM uddhav Thackeray speech) यावेळी केली.
“आयुष्यात विधानभवन-मंत्रालय आजूबाजूला फिरकलो नव्हतो. सभागृहात जे चाललं आहे, त्याला तुम्ही रोमान्स म्हणत असाल तर..” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
“शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणं खूप कठीण काम आहे. पण जर दोन घास पिकवणारा आत्महत्या करत असेल. तर आम्ही काय कामाचे,” असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
“शिवसेनाप्रमुखांचा मुलगा, प्रबोधनकारांचा नातू, त्यामुळे पत्रकारिता ही आमच्या घराण्यात आहे. राजकारणात आल्यावर घराणेशाहीवर टीका झाली. पण काही काळ मी ही सामनाचा संपादक होतो. आता हे स्विकारल्यामुळे ते सोडावं लागलं. पण तिथे घराणेशाहीबद्दल सुदैवाने टीका केली नाही. ही टीका आम्ही सहन करत आलो, इतकंच नव्हे तर माझ्यावरही टीका झाली की भाषण करता येत नाही. अनेक लोक म्हणायचे की यांचे वडील किती चांगलं भाषण करतात,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“पत्रकारितेची ताकद वाढती राहो,” अशा शुभेच्छाही उद्धव ठाकरेंनी (CM uddhav Thackeray speech) दिल्या.