मुंबई: राज्यात काहीजणांना माणसांची इंजेक्शन्स लागू पडत नाहीत. त्यांना गुराढोरांची इंजेक्शन्स लागतात. गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी आपण दसरा मेळाव्यात मुख्यमंत्रिपदाचा मास्क उतरवून बोलणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार मुंबईतील आजच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा खरपूस भाषेत समाचार घेतला. ( Uddhav Thackeray hits back Narayan Rane )
भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून नारायण राणे आणि नितेश राणे सातत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी तितक्याच सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिले. काहीजणांचा समाचार घेणे महत्त्वाचे आहे.
गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पोरं डराव डराव करत आहेत. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झालाय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आव्हान
काही लोकांना सत्तेचे स्वप्न पडत आहेत. अनेक दिवसांपासून सत्ता पाडण्याचं ऐकत आहे. हिंमत असेल तर सरकार पाडा, आम्ही तुमच्या सारखे गुळाच्या ढेपेला चिटकलेले मुंगळे नाहीत. वाटेला जाल तर काय ते दाखवून देऊ, असं थेट आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना दिलं.
राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्यामुळे या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय राजकीय भाष्य करणार याकडे संपूर्ण देशाचे लागले होते. अपेक्षेनुसार उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तडाखेबंद भाषणातून विरोधकांची पिसे काढली.
संबंधित बातम्या:
शिवसेनेची भविष्यातील वाटचाल भव्यदिव्यच असेल; राऊतांनी मांडली ‘महा’ क्रोनोलॉजी
CM Uddhav Thackeray Speech | हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आव्हान
( Uddhav Thackeray hits back Narayan Rane )