बुलडाणा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आज (शुक्रवार) बुलडाणा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी लोणार सरोवराची पाहणी केली. यावेळी सकाळच्या प्रसन्न वेळेत लोणार सरोवाराचं दृश्य विलोभणीय दिसत होतं. साहजिकच उद्धव ठाकरे यांच्यातला छायाचित्रकार जागा झाला आणि मग त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये लोणार सरोवराचे छानशे फोटो टिपले. (Cm Uddhav Thackeray Visit Lonar Lake And Click Some Picture)
बुलडाणामधील लोणार सरोवराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी साडे नऊच्या दरम्यान भेट दिली. लोणार सरोवराच्या व्ह्यू पॉईंटवरुन मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत बुलडाण्याचे पालकमंत्री, प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते. लोणार सरोवराविषयी अधिकारी मुख्यमंत्र्यांना माहिती देत होते. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि लोणार सरोवराचे काही फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद केले.
उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री असले तरी त्याअगोदर ते उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत. गेले अनेक वर्ष ते फोटोग्राफी करतात. त्यांनी अवकाशातून केलेली ‘एरिअल फोटोग्राफी’ चांगलीच गाजली. एकंदरितच ज्या ज्या वेळी त्यांना फोटोग्राफी करण्याची संधी मिळते त्या त्या वेळी ते आपला छंद जोपासत असतात. आजही संधी मिळताच त्यांनी लोणार सरोवराचे काही विलोभणीय दृश्य आपल्या मोबाईलध्ये कैद केली.
गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या लोणार सरोवराच्या पर्यटन वाढीसंदर्भात मुख्यमंत्री अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या सरोवराच्या विकासासंदर्भात काय काय उपापयोजना करता येतील, याची चाचपणी ते करणार आहेत. तसंच पाहणी झाल्यानंतर एक विशेष बैठकही आयोजित केली गेली आहे.
उद्धव ठाकरे यांनी 2004 साली देखील लोणार सरोवराला भेट दिली होती. त्यावेळी ते शिवसेनेचे नेते होते. तेव्हादेखील त्यांनी लोणार सरोवराचे काही फोटो आपल्या कॅमेरात कैद केले होते.
लोणार सरोवराची पाहणी केल्यानंतर आणि लोणार विषयीची बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे औरंगाबादकडे प्रयान करतील. औरंगाबादच्या नामांतरावरुन सध्या राजकारण तापलेलं आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा महत्त्वाचा मानला जातोय.
(Cm Uddhav Thackeray Visit Lonar Lake And Click Some Picture)
हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या एकजूटीत सरकारला देशद्रोह कसा दिसतो? संजय राऊतांचा सवालhttps://t.co/ozvzDFrhIA#sanjayraut | #shivsena | #farmerprotest | #Rajyasabha | @rautsanjay61 | @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 5, 2021