रत्नागिरी: संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पोहरादेवी येथे गर्दी जमवून केलेले शक्तीप्रदर्शन अयोग्य होते. याप्रकरणात चौकशी पूर्ण झाल्यावर दोषींवर नक्की कारवाई होईल, असे वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केले. सर्वांना समान न्याय, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. त्यामुळे पोहरादेवी प्रकरणात कोणीही सुटणार नाही, असेही विनायक राऊत यांनी सांगितले. (Shiv Sena MP Vinayak Raut on Sanjay Rathod Poharadevi matter)
विनायक राऊत यांनी गुरुवारी रत्नागिरीत ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी राजकीय दबावाला बळी पडून कारवाई करणे योग्य ठरणार नाही. पोहारादेवीतील गर्दीमुळे मुख्यमंत्री संजय राठोड यांच्यावर नाराज आहेत का, हे मला माहिती नाही. या प्रकरणावरुन महाविकासआघाडीत कोणतीही खदखद नाही. परंतु, जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत, असे विनायक राऊत यांनी सांगितले.
संजय राठोड प्रकरणात भाजपने केलेले आरोप चुकीचे असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. आरोप करण्यापलीकडे भाजपकडे काही उरले नाही. संजय राठोड प्रकरणात निपक्ष:पातीपणे चौकशी होईल. या प्रकरणात आरोप करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतल्याचे स्पष्ट होत असल्याचे राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थनासाठी झालेल्या गर्दीविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले. पोहरादेवीत नियमांचे उल्लंघन झाले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचे पालन केले जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संबंधित बातम्या:
संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवार नाराज?
नियम मोडला तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत: संजय राऊत
आधी दीड तास ताटकळत ठेवलं आणि नंतर दोन मिनिटांची भेट दिली, मुख्यमंत्री-राठोड भेटीचा इतिवृत्तांत
(Shiv Sena MP Vinayak Raut on Sanjay Rathod Poharadevi matter)