हिंदू-मुस्लिमांना जड जाईल असा कायदा लागू होऊ देणार नाही : उद्धव ठाकरे

| Updated on: Feb 02, 2020 | 10:57 AM

हिंदू-मुस्लिमांना जड जाईल, असा कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत केलं.

हिंदू-मुस्लिमांना जड जाईल असा कायदा लागू होऊ देणार नाही : उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : हिंदू-मुस्लिमांना जड जाईल, असा कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत केलं (Uddhav Thackeray On CAA). ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे मोठं विधान केलं. या मुलाखतीचा प्रोमो नुकताच सामनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला(Uddhav Thackeray On CAA). मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर आता CAA कायद्यावरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असं चित्र निर्माण झालं आहे.

मुख्यमंत्री प्रोमोमध्ये नेमकं काय म्हणाले?

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपली भूमिका काय?, असा प्रश्न विचारला. तसेच, बांग्लादेशी किंवा पाकिस्तानी घुसखोर जे आहेत त्यांना हाकलावंच लागेल या भूमिकेशी आपण ठाम आहात का?, असंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं.

यावर मुख्यमंत्री म्हणाले, “सीएए म्हणजे कुणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही”.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, “नागरिकत्व सिद्धं करणं, हे केवळ मुस्लिमांपुरतं नाही, तर ते हिंदूंनासुद्धा जड जाईल आणि तो कायदा मी येऊ देणार नाही.”

CAA ला देशभरातून विरोध 

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला. मात्र, संपूर्ण देशभरात या कायद्याला  विरोध होत आहे. अनेक संघटना याविरोधात आंदोलनं करत आहेत. तर, विरोधीपक्षांनीही या कायद्याला विरोध केला आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप या विषयावर मौन बाळगलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे या कायद्याला राज्यात लागू होऊ देणार की नाही, याबाबत संभ्रम होता. आता उद्धव ठाकरे यांनी CAA कायद्याबाबत आपलं मत स्पष्ट करत हा कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नसल्याचे संकेत दिले आहेत.