क्षीरसागर काका पुतण्याचं राजकीय वॉर, शिवसंग्रामला मोठा धक्का, राष्ट्रवादीत दीडशे जणांचा प्रवेश

| Updated on: Feb 09, 2021 | 10:38 AM

क्षीरसागर काका पुतण्याच्या राजकीय युद्धात शिवसंग्रामला मोठा धक्का बसलाय. | Shivsangram 150 karyakarta Join NCp

क्षीरसागर काका पुतण्याचं राजकीय वॉर, शिवसंग्रामला मोठा धक्का, राष्ट्रवादीत दीडशे जणांचा प्रवेश
विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम
Follow us on

बीड : बीडमध्ये सध्या राजकीय वातावरण तापले आहे. काका- पुतण्याच्या राजकीय युद्धात आता शिवसंग्रामला मोठा धक्का सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक शिवसेनेत गेल्यानंतर आ. संदीप क्षीरसागर (Sandip kshirsagar) यांनी शिवसंग्रामच्या एका बड्या नेत्याला फोडल्याने बीडमधील राजकीय समीकरण बदलले आहे. शिवसंग्रामचे (Shivsangram) विनोद हातांगळे (Vinod hatangale) यांच्यासह तब्बल 150 कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाल्याने शिवसंग्रामला मोठा धक्का बसला आहे.  (Conflict between Sandip And jaydatta Kshirsagar Shivsangram 150 karyakarta Join NCp)

बीड मतदारसंघात शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आ. संदीप क्षीरसागर या काका पुतण्यात रस्सीखेच सुरू असते. अगदी ग्रामपंचायत निवडणुकीत आ. संदीप क्षीरसागर यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यातच काही दिवसात राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून संदीप क्षीरसागरांना मोठा धक्का दिला होता.

बीड नगरपालिका निवडणुकीच्या डोळ्यासमोरच राष्ट्रवादीला धक्का बसल्याने संदीप क्षीरसागरांनी आता शिवसंग्रामच्या नेते- कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन आ. विनायक मेटे यांना मोठा झटका दिला आहे. पेठ बीड परिसरात विनोद हातांगळे यांची मोठी पकड आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने हातांगळे यांच्यासह 150 कार्यकर्त्यांना जाहीर प्रवेश देऊन रिकामी झालेली पोकळी भरून काढली आहे.

शिवसंग्राम पिछाडीवर

गेल्या वर्षभरात शिवसंग्रामला मोठी गळती लागली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांची कदर नसल्याची नाराजी पक्षात उघड झाली आहे. आ. विनायक मेटे आणि त्यांचे बंधू रामहरी मेटे यांच्याभोवतीच राजकारण फिरत असल्याने अनेक बढे कार्यकर्ते नाराज आहेत.

त्यातील विनोद हातांगळे हे देखील आहेत. हातांगळे यांच्या शिवसंग्राम सोडण्याने पक्षाला याची भारी किंमत मोजावी लागणार आहे.  त्यामुळे कार्यकर्ते टिकवून ठेवणे हे मेटे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

(Conflict between Sandip And jaydatta Kshirsagar Shivsangram 150 karyakarta Join NCp)

हे ही वाचा :

राजकारणाचा ‘नगरी पॅटर्न’, राम शिंदेंना विखेंचा झटका, पवारांसोबत आतून युती, ‘खास’ माणसासाठी पक्ष टांगणीला?

कोरोनामुळे 10 महिन्यांपासून कुटुंबीयांची गाठभेट नाही, मग व्हिडीओ कॉल आहे ना!, वर्ध्यातल्या तुरुंगाला मायेचा ओलावा