खदखद होती तर त्याचवेळी बाहेर पडायचे होते, अजित पवार यांना पुन्हा कुणी डिवचले ?

| Updated on: Apr 22, 2023 | 5:29 PM

राजकारणात कोणीही मुख्यमंत्री व्हायची इच्छा बाळगली तर त्यात वावगे काहीच नाही. अजित पवार यांच्याकडे 145 हा बहुमताचा आकडा असेल तर त्यांनी जरूर मुख्यमंत्री व्हावे...

खदखद होती तर त्याचवेळी बाहेर पडायचे होते, अजित पवार यांना पुन्हा कुणी डिवचले ?
PM NARENDRA MODI AND AJIT PAWAR
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

मुंबई : मोदी सरकारच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा समेमिरा लावला जातो हे चित्र मागील काही वर्षांपासून पहात आहोत. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणणाऱ्यांच्या पक्षातच आता भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना वॉशिंग मशिनमध्ये धूवून घेतात का ? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे. भाजपाने भ्रष्टाचाराची नकली मालिका चालवली असून त्याला जनता ओळखून आहे. भाजपामध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांच्यावर मोदी सरकार कारवाई का करत नाही ? असा सवाल काँगेसने केला आहे. तसेच, अजित पवार यांच्यावरही टीका काँग्रेसने टीका केली आहे.

पुलवामा घटना झाली त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. त्यावेळच्या घटनेचे सत्य त्यांनी जनतेसमोर उघड केले. आपल्या जवानांवर केलेला तो भ्याड हल्ला आहे. त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले पाहिजे. त्याचे उत्तर मोदी यांनी दिले नाही. परंतु, मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला म्हणूनच सत्यपाल मलिक यांना सीबीआयकडून नोटीस पाठवण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

हे सुद्धा वाचा

सत्यपाल मलिक हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. जम्मू काश्मीरसह इतर राज्यांचे राज्यपाल म्हणून मोदी सरकारनेच त्यांना जबाबदारी दिली होती. जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना पुलवामा घटना घडली त्याचे वस्तुस्थिती मांडतानाच भ्रष्टाचाराचा मुद्दाही त्यांनी मांडला.

मलिक यांच्या वक्तव्याने मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेला कळला म्हणूनच सीबीआयमार्फत नोटीस पाठवून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मलिक यांनी जी वस्तुस्थिती मांडली त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले पाहिजे. मोदीजी जवाब दो ! अशी विचारणा जनता करत आहे. म्हणून मोदी यांनी या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

खदखद होती तर त्याचवेळी बाहेर पडायचे होते

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आमचा नाईलाज होता असे म्हटले. त्यांचा जर नाईलाज होता तर त्यांनी मंत्रीपदाची शपथ कशासाठी घेतली ? त्यांनी मंत्रीपदाची शपथ घ्यायला नको होती, असा टोला पटोले यांनी अजित पवार यांना लगावला.

2004 साली पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाण आमचे नेते आहेत त्यांच्याबद्दल अजित दादांनी असे बोलावे ही अपेक्षा नाही. त्यांच्या मानत खदखद होती तर त्यावेळीच त्यांनी सोडून जायला हवे होते.

राजकारणात कोणीही मुख्यमंत्री व्हायची इच्छा बाळगली तर त्यात वावगे काहीच नाही. अजित पवार यांच्याकडे 145 हा बहुमताचा आकडा असेल तर त्यांनी जरूर मुख्यमंत्री व्हावे, असा टोलाही त्यांनी लगावला.