काँग्रेस-राष्ट्रवादी डेड एण्डला, भाजपच्या ट्रॅपमध्ये पवार अडकले : प्रकाश आंबेडकर

| Updated on: Jun 06, 2019 | 3:09 PM

"लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मौलवींनी फतवे काढले. मशिदीचा वापर करण्यात आल्यामुळे मुस्लिम मते आमच्यातून निसटली. त्यामुळे त्यांची काही मते ही विरोधकांना गेली, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादी डेड एण्डला, भाजपच्या ट्रॅपमध्ये पवार अडकले : प्रकाश आंबेडकर
Follow us on

सोलापूर : शरद पवार हे आता राष्ट्रीय नेते नसून ते आता बारामतीचे नेते आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते सोलापुरात बोलत होते. भाजपच्या ट्रॅपमध्ये शरद पवार अडकल्यामुळे ते आता बारामतीचे नेते आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या नादात संघटन विसंघटन करून ठेवले आहे. त्यामुळे ते आता डेड एण्डला आले आहेत. आता पुन्हा संघटन उभे करायचे असल्यास दोन्ही पक्ष्याने स्वतंत्र निवडणुका लढवायला हव्या, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

“लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मौलवींनी फतवे काढले. मशिदीचा वापर करण्यात आल्यामुळे मुस्लिम मते आमच्यातून निसटली. त्यामुळे त्यांची काही मते ही विरोधकांना गेली. त्यामुळे आम्ही 14 टक्क्यावर पोहचलो आहोत. येत्या विधानसभेला आम्हीच प्रमुख राजकीय पक्ष असू”, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

मोदी सत्तेत आल्यामुळे शिवसेनेला घाबरण्याचे काहीच कारण नसल्याची उपरोधिक टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. युतीमुळे 153 जागांची मोठी स्पेस मनसेसाठी खुली आहे. राज ठाकरे हे हुशार असल्यामुळे ते स्पेस सोडणार नाहीत, असंही आंबेडकर म्हणाले.

संबंधित बातम्या 

…तर काँग्रेस एनजीओ म्हणून शिल्लक राहील : प्रकाश आंबेडकर  

पाचव्या नव्हे, मोदींच्या शपथविधीला पवारांना पहिल्या रांगेतच स्थान होतं