नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूक 2019 साठी काँग्रेसने आपली पहिली 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशच्या 11 आणि गुजरातच्या चार जागांचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांनी सर्व चर्चा फेटाळून लावत लोकसभा उमेदवारी जाहीर केली. सोनिया गांधी त्यांच्या पारंपारिक रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याआधी सोनिया गांधी निवडणूक लढणार नाहीत अशी चर्चा सुरु होती, मात्र सोनिया गांधी पुन्हा मैदानात उतरणार आहेत.
अमेठीतून राहुल गांधी
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे त्यांच्या अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने जारी केलेल्या यादीत बड्या नेत्यांची नावं आहेत. जे नेते आपल्या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक लढवतात त्यांचीच नावं पहिल्या यादीत आहेत.
ज्या जागांवर वाद नाही अशी नावं जाहीर केली असून, काँग्रेसने आपले सर्व पत्ते अजून खोललेले नाहीत.
उत्तर प्रदेशातील 11 उमेदवार
गुजरातचे 4 उमेदवार
उत्तर प्रदेशचे 11 आणि गुजरातचे 4 मिळून 15 उमेदवार काँग्रेसने पहिल्या टप्प्यात जाहीर केले.
प्रियांका गांधींवर मोठी जबाबदारी
दरम्यान, यंदा सोनिया गांधींऐवजी प्रियांका गांधी काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता होती. मात्र सोनिया गांधी निवृत्तीच्या मूडमध्ये नाहीत. दुसरीकडे प्रियांका गांधी यांच्यावर काँग्रेसने उत्तर प्रदेशात मोठी जबाबदारी दिली आहे. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, त्यामुळे यूपीचा बालेकिल्ला खेचून आणण्याची जबाबदारी प्रियांका गांधींवर आहे.