नाशिक : मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या 25 मार्चला आसिफ शेख मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षात प्रवेश घेणार आहेत. आसिफ शेख आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. (Congress Ex MLA Asif Shaikh Join NCP)
आसिफ शेख यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित
आसिफ शेख यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. आसिफ शेख व्यक्तीगत कारणासाठी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जातील याची उत्सुकता अनेकांना लागली होती. अखेर आसिफ शेख यांनी राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या 25 मार्चला आसिफ शेख राष्ट्रवादीत प्रवेश घेणार आहेत. आसिफ शेख यांच्यासोबत त्यांचे समर्थक आणि काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे.
आसिफ शेख यांचे वडील काँग्रेसचे कट्टर समर्थक
आसिफ शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने मालेगावातील राजकीय परिस्थिती नक्कीच बदलणार आहे. मालेगाव शहरात शेख कुटुंबिय कॉंग्रेसचे निष्ठावंत मानले जातात. आसिफ शेख यांचे वडील काँग्रेसचे कट्टर समर्थक असून गेल्या कित्येक वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये सक्रीय आहे. मालेगाव महापालिकेत ही काँग्रेस- शिवसेनेची सत्ता आहे. राष्ट्रवादी मात्र विरोधात आहे
“गेल्या वीस वर्षापासून मी काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले. प्रामाणिकपणे काम करताना मालेगावातील जनतेची सेवा केली. माझ्या वैयक्तिक कारणासाठी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करुन पुढील दिशा ठरविली जाईल. कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हे सर्वस्वी कार्यकर्त्यांच्या निर्णयावरच अवलंबून असेल. 15 दिवसानंतर अंतिम निर्णय घेऊ” असे आसिफ शेख काँग्रेसला दिलेल्या राजीनाम्यानंतर म्हणाले होते.
आसिफ शेख यांचा अल्पपरिचय
संबंधित बातम्या :
जळगाव महानगरपालिकेत अजब योगायोग; पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेता