संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केले. त्याला सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार उत्तर दिले आहे. काँग्रेसने देशाता सातत्याने संविधानाचा अपमान केलेला आहे. एकाच कुटुंबाने संविधानावर आघात करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. देशावर एका कुटुंबाने ५५ वर्षे राज्य केलेले आहे. त्यामुळे काँग्रेसने संविधानाचा सर्वाधिक नुकसान करण्याचा प्रयत्न केला असल्याचे घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संसदेतील भाषणात म्हणाले की देशाच्या जनतेमुळे संविधान आज कायम असून उद्याही कायम राहणार आहे. देशाची जनता कोणत्याही परिस्थिती संविधानाच्या पाठीशी राहि्ल्याने संविधान टीकून असल्याचे मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. काँग्रेसचा कायम दुटप्पी व्यवहार राहीला आहे. काही तथ्य मी आज आपणा समोर सांगणार आहे. काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानावर घाला घालण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. मी एका कुटुंबाचा हा उल्लेख यासाठी करतो की ७५ वर्षापैकी एकाच कुटुंबाने ५५ वर्ष देशात राज्य केलेले आहे. त्यामुळे या देशाला काय- काय झाले हे माहिती करुन घेण्याचा अधिकार असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की या कुटुंबाचे कुविचार, कुनिती, कुरिती याची परंपरा निरंतर सुरू आहे. प्रत्येक स्तरावर या कुटुंबाने संविधानाला आव्हान दिलं आहे. या देशात १९४७ ते १९५२ या देशात निवडून आलेलं सरकार नव्हतं. एक अस्थायी व्यवस्था होती. एक सिलेक्टेड सरकार होती. निवडणूक झाली नव्हती. तोपर्यंत अंतरिम व्यवस्था म्हणून त्यांना सत्ता मिळाली. १९५२ पूर्वी राज्यसभा स्थापन झाली नव्हती. राज्यात सरकार नव्हते. संविधानही तयार झालं होतं. १९५१ मध्ये निवडून आलेलं सरकार नव्हतं तेव्हा अध्यादेश काढून काँग्रेसने संविधान बदलले त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला चढवला आणि हा संविधान निर्मात्यांचा अपमान होता असेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान पुढे म्हणाले की ही गोष्ट संविधान सभेत आली नसेल असं नाही. तिथे त्यांचं चाललं नाही. मग संधी मिळताच त्यांनी अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर हातोडा मारला. हा संविधान निर्मात्यांचा अपमान आहे. आपल्या मनाची गोष्ट मागच्या दरवाजाने केलं. निवडून आलेल्या सरकारचे पंतप्रधान नव्हते त्यांनी पाप केलं होतं. त्याचवेळी त्यावेळचे पंतप्रधान नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, जर संविधान आपल्या रस्त्यात आड आलं तर कोणत्याही परिस्थितीत संविधानात बदल केला पाहिजे. हे नेहरूंनी म्हटलं होतं.