मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जावर (Devendra Fadnavis Nomination Form) काँग्रेसने घेतलेला आक्षेप फेटाळण्यात आला आहे. काँग्रेसचे आशिष देशमुख हे मुख्यमंत्र्यांविरोधात उमेदवार (Devendra Fadnavis Nomination Form) आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रावर शिक्का मारणाऱ्या नोटरीची टर्म संपल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली. मात्र तपासणीअंती काँग्रेसचा आक्षेप फेटाळण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथपत्रासाठी जे मुद्रांक विकत घेतलं, ते 3 तारखेला घेण्यात आलं आहे. शपथपत्राची दस्तनोंदणी करणाऱ्या नोटरीचा शिक्काही या शपथपत्रावर आहे. मात्र या शिक्क्यामध्ये असलेल्या नोटरीचा कार्यकाळ 2018 पर्यंतच असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.
काँग्रेसच्या आक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडून सील करण्यात आला आहे. यावर सर्व बाजू तपासून निर्णय घेतला जाईल.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अर्जावरही आक्षेप
भाजपचे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जावरही आक्षेप घेण्यात आला होता. काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी विखेंच्या अर्जावर आक्षेप घेतला. राधाकृष्ण विखेंनी ज्या वकिलाकडून प्रतिज्ञापत्र तयार केलं, त्या वकिलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा विरोधकांनी केला होता, पण हा आक्षेपही फेटाळण्यात आलाय.