परमबीर सिंहांच्या लेटरबॉम्बनंतर काँग्रेसच्या गोटात हालचाली; हायकमांड अ‍ॅक्टिव्ह

| Updated on: Mar 22, 2021 | 8:54 AM

हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे या सगळ्या परिस्थितीचा अहवाल मागितला आहे. | parambir singh letter bomb

परमबीर सिंहांच्या लेटरबॉम्बनंतर काँग्रेसच्या गोटात हालचाली; हायकमांड अ‍ॅक्टिव्ह
हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे या सगळ्या परिस्थितीचा अहवाल मागितला आहे.
Follow us on

मुंबई: परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि सरकारच्या पातळीवर डॅमेज कंट्रोलसाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सरकारची बाजू लावून धरताना दिसत आहेत. परंतु, या सगळ्यात काँग्रेसचे (Congress) नेते म्हणावे तितके सक्रिय झालेले नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही या सगळ्यावर फारसे बोलताना दिसत नाहीत. (congress high command active after parambir singh letter bomb)

तर दुसरीकडे आता या सगळ्या घडामोडीनंतर दिल्लीत काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे या सगळ्या परिस्थितीचा अहवाल मागितला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी रविवारी रात्री व्हीडिओ कॉन्फरन्स घेऊन राज्यातील नेत्यांना यासंदर्भात निर्देश दिले. त्यांनी नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळे आता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी या सगळ्यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दिल्लीत ‘काका मला वाचवा’ असा आवाज घुमत होता; भाजपचा राष्ट्रवादीला सॉल्लिड टोला

भाजपने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्यंगचित्र ट्विट करुन राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे. या व्यंगचित्रात घाबरलेले अनिल देशमुख आणि त्यांच्यापाठी शरद पवारांची सावली दाखवण्यात आली आहे. अनिल देशमुख हे ‘काका मला वाचवा’ अशी हाक मारत असल्याचे दिसत आहे.

हे व्यंगचित्र ट्विट करताना भाजपने एक कॅप्शनही लिहली आहे. पूर्वी शनिवार वाड्यातून आलेला आवाज काल दिल्ली मधून येत होता म्हणे. भाजपच्या या टीकेचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीच्या दिशेने होता.

‘गुजरातच्या पोलीस प्रमुखांनी अमित शाहांवर आरोप केले होते, तेव्हा भाजपने राजीनामा घेतला होता का?’

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पत्रकारपरिषद घेतली होती. यावेळी त्यांनी भाजपवर आगपाखड केली. 2002 साली अमित शाह गुजरातच्या गृहराज्यमंत्रीपदी होते तेव्हा तत्कालीन पोलीस प्रमुख डी.जी. वंजारा यांनी अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तेव्हा भाजपने अमित शाह यांचा राजीनामा घेतला होता का, असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला होता.

संबंधित बातम्या:

अनिल देशमुख यांच्याविरोधात पहिली तक्रार दाखल, तक्रारीत शरद पवार यांचंही नाव

Parambir Singh Letter : अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, मुख्यमंत्री काय कारवाई करणार?

‘गुजरातच्या पोलीस प्रमुखांनी अमित शाहांवर आरोप केले होते, तेव्हा भाजपने राजीनामा घेतला होता का?’

(congress high command active after parambir singh letter bomb)