“अब्दुल सत्तार नावाचा प्राणी दुर्दैवाने मंत्री!”, काँग्रेस नेत्याची जहरी टीका

| Updated on: Oct 10, 2022 | 3:30 PM

काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. पाहा...

अब्दुल सत्तार नावाचा प्राणी दुर्दैवाने मंत्री!, काँग्रेस नेत्याची जहरी टीका
Follow us on

संजय सरोडे, जालना : जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. सत्तारांना प्राण्याची उपमा त्यांनी दिलीय. “अब्दुल सत्तार (Abdul Sattar) नावाचा प्राणी दुर्दैवाने मंत्री झाले आहेत!”, असं कैलास गोरंट्याल म्हणालेत.काम असेल तेव्हा सत्तार पडतील, बॅगा उचलतील आणि काम संपलं की पाठीत खंजीर खुपणार!, हे निश्चित आहे”, असंही गोरंट्याल (Kailas Gorantyal) म्हणालेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक खतगावकर आणि अब्दुल सत्तार यांच्यात वाद झाल्याची चर्चा आहे. त्यावर वाद झाला या वादावरून कैलास गोरंट्याल यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला.

अब्दुल सत्तार नावाचा प्राणी दुर्दैवाने मंत्री आहे. अब्दुल सत्तार कुणाशीच कधीही चांगला वागत नाहीत. सत्तार यांचं काम असेल तरच ते गोड बोलतात. प्रसंगी पाया पडतात. बॅगा उचलतात. काम संपलं की पाठीत खंजीर खुपसायलाही मागेपुढे पाहत नाहीत, असं म्हणत कैलास गोरंट्याल यांनी हल्लाबोल केलाय.

अब्दुल सत्तार हे या पूर्वीही शिवाजीराव पाटील निलंगेकर, छगन भुजबळ मंत्री असतांना त्यांच्या अंगावर धावून गेले होते. सत्तार यांचा अॅटिट्युड तसाच आहे. सत्तार हे मॅनर्सलेल व्यक्तीमत्व आहे, असंही गोरंट्याल म्हणालेत.

गोरंट्याल यांनी सत्तार यांना उर्दू शेरच्या माध्यमातून टोला लगावला आहे.”इफ्तीदा इश्क में होता है क्या? आगे आगे देखो होता है क्या!”, असं गोरंट्याल म्हणालेत. आता या सगळ्या टीकेला सत्तार काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असेल.

शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी विनंती केली आहे. सत्तारांना मंत्रीमंडळातून काढून टाका. नाहीतर भविष्यात तुम्हालाच त्रास होईल, असं गोरंट्याल म्हणालेत.