काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दामोदर शिंगडा यांचे अल्पशा आजाराने निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

| Updated on: May 02, 2021 | 9:41 PM

काँग्रेसचे माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर वसईच्या कार्डिनल ग्रेसस हॉस्पिटलमध्ये अपचार सुरु होते. (congress leader damodar shingada died)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दामोदर शिंगडा यांचे अल्पशा आजाराने निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
DAMODAR SHINGADA
Follow us on

पालघर : काँग्रेसचे माजी खासदार दामोदर शिंगडा (Damodar Shingada) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर वसईच्या कार्डिनल ग्रेसस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, उपचाराला साथ न दिल्यामुळे वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. शिंगडा गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांपैकी एक होते. त्यांनी एकूण 9 वेळा खासदारकीची निवडणूक लढवली. यापैकी 5 वेळा ते लोकसभेत खासदार म्हणून गेले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांना लिटिल खासदार म्हणून संबोधित करायच्या. (Congress leader and former MP Damodar Shingada died in Vasai hospital)

सलग 4 वेळा खासदार म्हणून निवडून आले

माजी खासदार दामू शिंगडा यांच्या निधनाने पालघर ठाणे जिल्ह्याचा सुमारे पाच दशकांचा सामाजिक राजकीय दुवा निखळला आहे. ते वक्ते नव्हते परंतू खासगी बैठकीत फड गाजवणारे नेते होते. त्यांचा मुत्सद्दीपणा त्यांच्या विरोधकांनासुद्धा मान्य केला होता.  इंदिरा गांधी त्यांना लिटल खासदार म्हणत असत. वयाच्या 25 व्या वर्षी क्रिकेट खेळत असताना त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर ते सलग चार वेळा खासदार म्हणून निवडणून आले.

नाना पटोलेंकडून श्रद्धांजली 

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार दामोदर शिंगडा यांच्या निधनामुळे आदिवासी समाजाचा कैवारी हरपला आहे, अशा भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या. दामोदर शिंगडा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातून आलेल्या दामोदर शिंगडा यांनी आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. युवक काँग्रेसच्या माध्यमातून ते सक्रिय राजकरणात आले. लोकांशी जुळलेली नाळ तसेच दांडग्या जनसंपर्कामुळे शिंगडा आदिवासी समाजात ते अत्यंत लोकप्रिय झाले, असे नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

तसेच, सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या दामोदर शिंगडा वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. ते पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. पोशेरी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शाळा आणि विद्यालयं सुरु करून दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे, असेसुद्धा नाना पटोले म्हणाले. पुढे बोलताना दामोदर शिंगडा यांना श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिंगडा कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे पोटले यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

2021 Vidhan Sabha Election Results LIVE : नरेंद्र मोदी यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन, बंगालला सहकार्य करण्याचं आश्वासन

“जनतेने दिलेला कौल स्वीकारायला हवा होता, हा तर रडीचा डाव”, ममतांच्या पराभवानंतर शरद पवार बरसले

West Bengal Election Results 2021 LIVE: नंदीग्रामच्या निकालात गडबड, या विरोधात कोर्टात जाणार, मतमोजणी परत घ्या : तृणमूल काँग्रेस

(Congress leader and former MP Damodar Shingada died in Vasai hospital)