मुंबई: कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीत सेलिब्रिटी आणि मंत्र्यांचा मुलांना अडकवण्याचा कट काशिफ खान याने आखला होता. या पार्टीला येण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनाही गळ घालण्यात आली होती. मात्र, अस्लम शेख या पार्टीला गेले नाहीत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. ते रविवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
नवाब मलिक यांनी पत्रकारपरिषदेत पुन्हा एकदा काशिफ खान या ड्रग्ज पेडलरचा उल्लेख केला. क्रुझ पार्टीत काशिफ खानही उपस्थित होता. नमास्क्रे फॅशन टीव्हीच्या स्पॉन्सरचा ब्रँड आहे. काशिफ खान हा त्याचा मालक आहे. नमास्क्रेच्या पेपर रोलमध्ये ड्रग्ज घेतलं जातं असं सांगितलं जाते.
या केसमध्ये हे सँपल स्टॉक सीझ केलं तर त्याच्या मालकाला का अटक केली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला. देशातील अनेक पोलीस ठाण्यात काशिफ खानविरोधात गुन्हे दाखल आहेत. दिल्ली कोर्टाने फरार घोषित केले आहे. तो समीर वानखेडेचा साथीदार आहे. गोव्यात काशिफ खानची खूप संपत्ती आहे. आपण फॅशन टीव्हीचा इंडिया हेड असल्याचे तो सर्वांना सांगतो. तो पार्टीत नाचत होता. एनसीबीने त्याला अटक का केली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला.
9 तारखेला मी एक पीसी घेतली होती. त्यावेळी एक व्हिडीओ दाखवला होता. त्यात वानखेडे 8 ते 10 लोकांना ताब्यात घेतल्याचं सांगत असल्याचं दिसत होतं. त्यावर 8 की 10 लोकांना ताब्यात घेतलं? एक अधिकारी नेमका आकडा का सांगत नाही? असा सवाल मी केला होता. त्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन 8 नव्हे तर 11 लोकांना अटक झाल्याचं सांगितलं. अमीन फर्निचरवाला, प्रतिक गाभा,ऋषभ सचदेवांना घेऊन जात असल्याचा व्हिडीओ आम्ही दाखवला. या तिघांचे कुटुंबीय त्यांना एनसीबी कार्यालयातून घेऊन जात असल्याचं या व्हिडीओत दिसत होतं. मोहीत कंबोज यांचे साले असल्यानेच त्यांना सोडण्याचं आम्ही सांगितलं. त्यानंतर वानखेडेने पीसी घेऊन 14 लोकांना अटक केल्याचं सांगितलं. पण या 14 लोकांचं नाव सांगितलं नाही. पण या तिघांना सोडण्यात आलं हाच मोठा खेळ आहे, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
मोहित कंबोज हाच आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप