मुंबई : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी वाढत असलेली माहागाई (inflation), वेगवेगळ्या वस्तूंवर लावण्यात आलेला जीएसटी (GST) टॅक्स आणि ईडीकडून सुरू असलेल्या विरोधकांच्या चौकश्या यावरून केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आज प्रत्येक वस्तूवर जीएसटी आकारला जातो. महागाई गगनाला भिडली आहे. तुम्ही हॉटेमध्ये जेवायला गेलात आणि तीन माणसं जर असाल तर त्या बिलावर चौथ्या मानसाच्या बिलाइतका जीएसटी आकारला जातो. त्यामुळे नाराज होऊ नका चौथे मोदी जेवले असं समजा असा टोल थोरात यांनी भाजपाला लगावला आहे. तसेच देशात सध्या महागाई सर्वोच्च स्थानावर पोहोचली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. काँग्रेसच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर एक,दोन रुपयांनी वाढले तर आंदोलने होत होती. मात्र आता कोणीच काही बोलत नसल्याचे देखील थोरात यांनी म्हटलं आहे.
थोरात यांनी वाढत असलेली महागाई आणि जीएसटीवरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधाला आहे. तीन माणसं हॉटेलमध्ये जेवणासाठी जातात. जेवणाच्या बिलावर जीएसटी आकारला जातो. तेव्हा तुम्ही असं समजा की चौथा माणून हे मोदी जेवले आहेत. असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. तसेच देशात सध्या महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र सध्या कोणीच काही बोलत नाही. कॉँग्रेसच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर एक – दोन रुपयांनी वाढले तर आंदोलने होत होती, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सध्या जवळपास सर्वच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावरून देखील थोरात यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधाला आहे. देशात ईडी, सीबीआय सारख्या संस्थानचा गैरवापर सुरू आहे. लोकशाहीची गळचेपी सुरू आहे. सरकारी यंत्रणा हाताशी धरून विरोधकांवर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोपही यावेळी थोरात यांनी केला. तसेच माहागाई, आणि जीएसटीवरून देखील त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे.