नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील सरकार संकटात आल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी चिंता व्यक्त केली आहे (Kapil Sibal on Rajasthan Political Crisis). घोडे तबेल्यातून फरार झाल्यावरच आपण जागणार आहोत का? असा थेट सवाल सिब्बल यांनी विचारला आहे. तसेच राजस्थानमधील पक्षाच्या स्थितीबद्दल काळजीत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं.
कपिल सिब्बल म्हणाले, “घोडे तबेल्यातून फरार झाल्यावरच आपण जागणार आहोत का? पक्षाच्या स्थितीबद्दल काळजी वाटत आहे.” राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. भाजप राजस्थान काँग्रेसचे आणि इतर काही अपक्ष आमदार 10-15 कोटी रुपये देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
Worried for our party
Will we wake up only after the horses have bolted from our stables ?
— Kapil Sibal (@KapilSibal) July 12, 2020
दरम्यान, मध्य प्रदेशनंतर राजस्थानमधील काँग्रेस सरकारही संकटात येण्याची भीती वर्तवली जात आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील संघर्ष वाढत असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजप राजस्थानमध्ये घोडेबाजाराचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला आहे. तर सचिन पायलट दिल्ली दरबारी पोहोचल्याने चर्चांना ऊत आला आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
अशोक गहलोत यांनी काल (शनिवारी) रात्री साडेआठ वाजता कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत राजस्थान सरकारचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित नव्हते. पायलट यांच्यासह काँग्रेसचे 10 आमदार दिल्लीत गेल्याने राजकीय संकट गडद झाल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा :
Kapil Sibal on Rajasthan Political Crisis