नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन सुरु असलेला वाद लवकरच मिटणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आल्याचे माहिती मिळत आहे. याबाबत लवकरच राहुल गांधी स्वत: घोषणा करणार आहे, असेही सांगितले जात आहे. (Rahul Gandhi will Become Congress President Sources)
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, नारायण स्वामी, भुपेश बघेल, कॅप्टन अमरिंदर सिंह उपस्थित आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरु होत आहे. ही बैठक सुरु झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी आपला राजीनाम्याचा प्रस्ताव दिला.
त्यावेळी सोनिया गांधी यांनी राजीनामा देऊ नये अशी विनंती या बैठकीदरम्यान करण्यात आली. राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं अशी मागणी काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीत करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी आपण अध्यक्ष व्हा, अशी विनंती केली. राहुल गांधी यांनी पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपद स्विकारावं अशी विनंती काँग्रेस शासित राज्याच्या सर्व मुख्यमंत्री यांनी केली आहे.
सोनिया गांधीची कार्यसमिती पुढे राजीनाम्याची ऑफर दिली. तसेच कार्यकारिणीने नवा अध्यक्ष निवडा, अशी विनंती त्यांनी केली. तसेच त्या 23 पत्रलेखक नेत्यांवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी नाराजी व्यक्त केली.
मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी बैठकीतून केली. पत्र लिहिण्यासाठी हीच वेळ का निवडली, असा प्रश्नही राहुल गांधींनी उपस्थितीत केला. या 23 पत्रलेखक नेत्यांवर CWC च्या नेत्यांची टीका केली. या नेत्यांना उत्तर मागणार असल्याची माहिती समोर येत आहे.
काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन वादावादी
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी असलेल्या सोनिया गांधी यांनी पद स्वीकारुन वर्ष होत आहे. काँग्रेस कार्यकारिणी अर्थात CWC बैठक आज होत आहे. या बैठकीत सोनिया गांधी राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन गट पडले आहेत. एका गटाची मागणी ही सोनिया गांधी अध्यक्षपदी राहाव्या, तर दुसऱ्या गटाने राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी केली आहे. काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी घराण्याकडेच रहावं यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सदस्य आग्रही आहेत.
काँग्रेसच्या 23 नेत्यांचं पत्र
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र पाठवले आहे. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा असं या पत्रात म्हटलं आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचा समावेश असल्याचे बोललं जातं आहे.पंजाबमधून गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष निवडण्यास विरोध करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याबाबत विरोध केला आहे.
पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडे असेल तर भाजपविरोधात लढता येईल : सुनील केदार
“काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मी मनापासून समर्थन करतो. मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी गांधी घराण्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे हे लज्जास्पद आहे. त्यांनी त्यांच्या या कृत्याबद्दल तातडीने माफी मागितली पाहिजे. अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाहीत”, असं ट्विट राज्याचे दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी केलं.
राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर सोनियांकडे अध्यक्षपद
सोनिया गांधी 14 मार्च 1998 पासून 16 डिसेंबर 2017 पर्यंत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राहुल गांधी यांनी दोन वर्ष अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र, गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या आग्रहानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. (Rahul Gandhi will Become Congress President Sources)
संबंधित बातम्या :
अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधींनी जर सांगितलं, तर महाराष्ट्रातील सत्ता सोडू : विजय वडेट्टीवार
पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरांनी प्रश्न उपस्थित करणे लज्जास्पद, सुनील केदार यांचा हल्लाबोल