मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात समोर आलेल्या व्हॉट्सअॅप चॅटनंतर चौकशीत अनेक अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. त्यानंतर एनसीबीकडून संबंधित अभिनेत्रींना समन्स पाठवण्यापासून चौकशी आणि नंतर अटकेचीही कारवाई होत आहे. मात्र, या सर्व घटनाक्रमांमध्ये एनसीबीच्या कार्यालयातील गुप्त चौकशीचे मिनिटा-मिनिटाचे तपशील माध्यमांमध्ये येत आहेत. यावरुनच महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी एनसीबीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत (Sachin Sawant raise question on how NCB office investigation information leak).
सचिन सावंत यांनी एनसीबीच्या कार्यालयातील गुप्त चौकशीचे मिनिटा-मिनिटाचे तपशील माध्यमांमध्ये कसे येत आहेत? असा प्रश्न विचारला आहेत. तसेच एनसीबीने समोर येऊन माध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चेचं खंडन करावं, असं आवाहन केलंय. एनसीबीने असं न केल्यास गुप्त चौकशीची माहिती एनसीबीकडूनच हेतुपूर्वक पसरवली जात आहे, असं मानलं जाईल, असा इशाराही सचिन सावंत यांनी दिला. त्यांनी याबाबत ट्विट करत आपली भूमिका मांडली.
Minute to minute update of what is going on in NCB office is being discussed on Media. NCB must come out and refute the whole narrative. If not then it will be considered as Information deliberately leaked by NCB. It would be very sad if this is true!
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 26, 2020
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “माध्यमांमध्ये एनसीबीच्या ऑफिसमध्ये काय सुरु आहे याबद्दल मिनिटा-मिनिटाची चर्चा सुरु आहे. एनसीबीने समोर येऊन या सर्व चर्चा किंवा दाव्यांचं खंडन करावं. जर त्यांनी तसं केलं नाही तर एनसीबीकडून हेतुपूर्वक ही माहिती लीक केली जात आहे असं समजलं जाईल. जर हे खरं ठरलं तर फार दुर्दैवी असेल.”
— Karan Johar (@karanjohar) September 25, 2020
दरम्यान, प्रसिद्ध निर्माता करण जोहरने देखील माध्यमांमध्ये सुरु असलेल्या बातम्यांवर आणि त्यात करण्यात येणाऱ्या दाव्यांवर आक्षेप घेतला आहे. तसेच माध्यमांनी हे न थांबवल्यास त्यांच्यावर नाईलाजाने कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही करण जोहरने दिला आहे.
संबंधित बातम्या :
महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा हीन डाव उघड : सचिन सावंत
कंगना भाजपची कठपुतली, महाराष्ट्राच्या बदनामीच्या कटाचा भाग : सचिन सावंत
संबंधित व्हिडीओ :
Sachin Sawant raise question on how NCB office investigation information leak