मुंबई: केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून वाढल्यांचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकार महाराष्ट्राबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप केला आहे. तर, दुसरीकडे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी उपरोधिकपणे केंद्र सरकारवर टीका केली आहे. सत्यजीत तांबे यांनी उपरोधिक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. (Congress leader Satyajeet Tambe take jibe of Central Government over Remdesivir and Oxygen supply to Maharashtra)
सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पीएमओ कार्यालयादरम्यान झालेला काल्पनिक संवाद मांडला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पीएमओ कार्यालयालामधील फोन करतात. ते पीएमओ कार्यालयााला महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यासंदर्भात नरेंद्र मोदी यांच्याशी बोलायचं असल्याचं सांगतात. तर पीएमओ कार्यालयाकडून पीएम सध्या डू नॉट डिस्टर्ब मोडवर असल्याचं उत्तर येतं. यावर उद्धव ठाकरे पंतप्रधान कधी उपलब्ध होतील, असं विचारतात. त्यानंतर पीएमओ कार्यालय ते 2 मे नंतर सर्व राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर उपलब्ध होतील, असं सांगते. सत्यजीत तांबे यांनी या उपरोधिक ट्विटद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
CM Uddhav T- Hello, Is it PMO ?
PMO- Yes Sir.
UT- I need to speak to PM for urgent Oxygen & Remedisivir supply for Maharashtra.
PMO- Sir, PM Sir is on “Do Not Disturb” mode.
UT- Ok, but when will he be available?
PMO- After 2nd May once all state elections are over.
?♂️— Satyajeet Tambe (@satyajeettambe) April 17, 2021
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी आधी ट्विट करून आणि नंतर माध्यमांसमोर येऊन हा आरोप केला आहे. केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील 16 निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या 20 लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकार त्यास नकार देत आहेत, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या:
BMC ने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर द्यावेत, बेड मिळण्यात अडचण येऊ देऊ नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, केंद्राची कंपन्यांना धमकी; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
(Congress leader Satyajeet Tambe take jibe of Central Government over Remdesivir and Oxygen supply to Maharashtra)