सोनिया गांधी यांची ‘डिनर डिप्लोमसी’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक वाढले, ‘हे’ आठ पक्ष विरोधकांमध्ये सामील

| Updated on: Jul 12, 2023 | 4:30 PM

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 23 जूनला पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीला 15 विरोधी पक्ष उपस्थित होते. नितीश कुमार यांच्यापाठोपाठ आता कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही विरोधी पक्षांना 'डिनर'चे निमंत्रण दिले आहे.

सोनिया गांधी यांची डिनर डिप्लोमसी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक वाढले, हे आठ पक्ष विरोधकांमध्ये सामील
CONGRESS SONIYA GANDHI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधी पक्ष एकवटले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 23 जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीला सुमारे 15 पक्षांचे नेते उपस्थित होते. तर, महाराष्ट्रातून शरद पवार, उद्धव ठाकरे हे नेते या बैठकीला हजर राहिले होते. तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, राज्यसभा खासदार संजय सिंह आणि राघव चढ्ढा हे नेते आपच्यावतीने उपस्थित होते.

नितीश कुमार यांच्या या बैठकीनंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही विरोधी पक्षांची एक बैठक बोलावली आहे. मात्र, यावेळी आणखी 8 प्रमुख पक्ष हजेरी लावणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक वाढत असल्याची एकच चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसने बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी आम आदमी पार्टीसह एकूण 24 पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. केजरीवाल यांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना आणि बदल्यां संबंधित केंद्राच्या अध्यादेशाचा मुद्दा या बैठकीत उपस्थित केला होता.

विरोधी पक्षांना एकत्र करणार

विरोधी पक्षाची एकजूट अधिक भक्कम व्हावी यासाठी या बैठकीसाठी काँग्रेसकडून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षालाही बैठकीचे निमंत्रण दिले आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जोरदार ‘टक्कर’ देण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र करण्याच्या उद्देशाने ही बैठक होणार आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या बैठकीचे निमंत्रण विरोधी पक्षांना दिले आहे. विरोधी पक्षांची गेल्यावेळी झालेली बैठक यशस्वी झाली होती. यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अशा चर्चा भविष्यातही होत राहणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

येत्या 18 जुलै रोजी बेंगळुरू येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीच्या आधी एक दिवस ‘डिनर’चे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी उपस्थित रहाणार आहेत. जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांनी पाटणा येथे बोलावलेल्या विरोधी पक्षांचा बैठकीमध्ये 15 पक्ष सहभागी झाले होते. मात्र, बंगळूर येथे होणाऱ्या बैठकीसाठी 24 पक्षांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. ते नवीन आठ पक्ष या बैठकीला उपस्थित रहाणार आहेत अशी माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.

बैठकीत सहभागी होणारे ते 8 पक्ष

MDMK – मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम

KDMK – कोंगू देसा मक्कल काची

VCK – विदुथलाई चिरुथाईगल काची

RSP – रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी

AIFB – ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक

IUML – इंडियन युनियन मुस्लिम लीग

केरळ काँग्रेस (जोसेफ)

केरळ काँग्रेस (मणी)