मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचे पाठ स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहातून देशाला सांगितले. (Ram Kadam Criticize CM Uddhav Thackeray) मात्र, आमचा प्रश्न एकच आहे, काँग्रेस नेते सावरकरांसंदर्भात अपमानकारक भाषा बोलत होते त्यावेळी शिवसेना गप्प का होती?”, असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरले होते. त्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत (Ram Kadam Criticize CM Uddhav Thackeray).
1/1.. मा.@OfficeofUT यांनी हिंदुत्वाचे पाठ स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहातून देशाला सांगितले मात्र आमचा प्रश्न एकच आहे #Cong नेते सावरकरां संदर्भात अपमानकारक भाषा बोलत होते त्या वेळी शिवसेना गप्प क़ा होतीं ?
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) October 25, 2020
यावर राम कदम यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. “आज उद्धव ठाकरे हे सर्वांवर टीका करत असताना त्यांना सावरकरांचा अपमान करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना नेत्यांना चालतात का? सत्ता आणि सिंहासनासाठी सावरकरांचा अपमान शिवसेनेला चालतो? हा खरा प्रश्न आहे, असं म्हणत राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
1/2 .. आज @OfficeofUT हे सर्वांवर टीका करत असताना त्यांना सावरकराचा अपमान करनारे काँग्रेस नेते @RahulGandhi शिवसेना नेत्यांना का ठेवले नाहीत ? सत्ता आणि सिंहासनासाठी सावरकरांचा अपमान शिवसेनेला चालतो ? हा खरा प्रश्न ?
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) October 25, 2020
त्याशिवाय, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन त्यांच्यावर पलटवार केला. “ज्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी राम मंदिर विरोधकांसमोर गुडघे टेकले; त्यांनी हिंदू मंदिरं, घंटा, हिंदू धर्म, हिंदू पूजा पद्धती, आरतीची चेष्टा करू नये”, असं किरीट सोमय्या म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपर चौफेर टीका केली. मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक जण सरकार पाडण्याच्या मागे आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केला. तसेच हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवा असं आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलं. त्यांनतर विरोधकांनाही ठाकरेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे (Ram Kadam Criticize CM Uddhav Thackeray).
काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या; उद्धव ठाकरेंचा हल्ला
मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी असेल तर हे मोदींचच अपयश; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना न्याय देईन, मुख्यमंत्री म्हणून वचन : उद्धव ठाकरे