Congress Manifesto 2019 नवी दिल्ली: काँग्रेसने लोकसभा निवडणूक 2019 साठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. जन आवाज असं या जाहीरनाम्याला नाव देण्यात आलं असून, त्याच्या मुखपृष्ठावर ‘हम निभाएंगे’ असं लिहिण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. राहुल गांधी यांनी यावेळी 5 मोठ्या घोषणा केल्या.
काँग्रेसने सत्तेत येताच देशातील 20 टक्के गरिंबासाठी किमान वेतन आधारित न्याय योजना आणण्याची घोषणा केली. यानुसार गरिबांच्या खात्यात दरमहा 6 हजार रुपये म्हणजेच वार्षिक 72 हजार रुपये देण्यात येतील. – राहुल गांधींनी केलेल्या 5 घोषणा.
1) न्याय योजना – गरिबीवर वार, 72 हजार
हिंदुस्थानी जनतेच्या खात्यात सरकार किती रक्कम टाकू शकतो? याची मी माहिती घेतली. गरिबीवर वार, 72 हजार, राहुल गांधींची घोषणा, काँग्रेस न्याय योजना आणणार, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
2) रोजगार
मोदींनी 2 कोटी रोजगाराचं खोटं आश्वासन दिलं. मी माझ्या समितीला विचारलं सत्य काय आहे? तर त्यांनी आम्हाला आकडा दिला. त्यानुसार आम्ही 22 लाख रोजगार देऊ. 10 लाख तरुणांना ग्रामपंचायतीत रोजगार उपलब्ध करुन देऊ, असं राहुल गांधी म्हणाले.
तरुणांना उद्योगांसाठी तीन वर्षांसाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागणार नाही. बँकांचे दरवाजे खुले असतील, असं राहुल गांधींनी सांगितलं.
Congress President Rahul Gandhi: PM had spoken about MGNREGA. He mocked and said it is a bogus and useless scheme. Today everyone knows how much it helped the country. So now we want to guarantee jobs for 150 days, instead of 100 days, under the scheme. pic.twitter.com/dgzAekiJ3y
— ANI (@ANI) April 2, 2019
3) मनेरगा 100 वरुन 150 दिवसांवर
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा अंतर्गत देण्यात येणारा रोजगाराचा कालावधी 100 वरुन 150 करण्याची घोषणा
4) शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट
राहुल गांधींनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट असेल असं आश्वासन दिलं. जसं रेल्वेसाठी स्वतंत्र बजेट असतं, तसंच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट असेल, असं राहुल गांधींनी सांगितलं. जर शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं नाही तर त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही
5) शिक्षण आणि आरोग्य
दरडोई उत्पन्नाच्या अर्थात जीडीपीच्या 6 टक्के खर्च शिक्षणावर करण्याची घोषणा राहुल गांधींनी केली. आरोग्याबाबत राहुल म्हणाले, आमचा खासगी विमान कंपन्यांवर विश्वास नाही. गरिबांनाही चांगल्या दर्जाच्या रुग्णालयात उपचार मिळतील.