नवी दिल्ली : राज्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर नवनिर्वाचित काँग्रेस मंत्री यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधीची दिल्लीत (congress minister meet sonia gandhi) भेट झाली. बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, असलम शेख, माणिकराव ठाकरे, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, अशोक चव्हाण, के.सी. पाडवी, विजय वडेट्टीवार, मल्लिकार्जुन खर्गे, सुनील केदार, के.सी. वेणूगोपाल यासारखे सर्व दिग्गज नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटले. यावेळी या दिग्गज नेत्यांची खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी (congress minister meet sonia gandhi) दिली .
बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या सर्व नेत्यांची काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासोबत खाते वाटपावर चर्चा झाली. काही खात्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याशी चर्चा होणे बाकी आहे. येत्या दोन ते तीन दिवसात दुरुस्ती झाल्यानंतर खातेवाटप होईल. काही जागा मर्यादित असल्यामुळे नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र ती लवकरच दूर केली जाईल.
राज्यात गेल्या काही महिनाभरात खूप राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राज्यात तीन पक्षांचे सरकार बनलं आहे. त्यामुळे जागा मर्यादित आहेत. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने काही लोक नाराज आहेत. मात्र काही लोकांची नाराजी असेल ती दूर केली जाईल. असेही बाळासाहेब थोरात यांनी (congress minister meet sonia gandhi) स्पष्ट केलं.
पक्षाला मजबूत करण्याचं आणि पक्षाच्या धोरणावर चालण्याचं काम केलं जाईल. हा विश्वास दाखवून देण्यासाठी ही भेट होती. पक्षात कोणाचीही नाराज नाही. जर नाराज झाले असतील तर ते दूर केले जातील. खातेवाटपावर बाळासाहेब थोरात मल्लिकार्जुन खर्गे सांगतील असे स्पष्टीकरण कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी सोनिया गांधींच्या भेटीनंतर दिले.
दरम्यान या भेटीनंतर कॅबिनेट मंत्री के.सी.पाडवी यांनी शपथ घेतानाच्या प्रसंगाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मला वाटत नाही की मी कुठे चुकलो नाही. त्यांना काही गैर वाटत असेल. पक्षात कोणीही नाराज नाही. जर नाराज असतील तर त्यांना महामंडळे, अध्यक्षपदं दिली जातील असेही त्यांनी स्पष्ट (congress minister meet sonia gandhi) केले.