कोल्हापूर : पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघापैकी (Teacher Graduate Constituency Election) कोणतीही एक जागा काँग्रेसला (Congress) द्या, अशी मागणी गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली. उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी आमची, अशा शब्दात सतेज पाटलांनी काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांना आश्वस्त केलं. (Congress Minister Satej Patil demands one seat for Teacher Graduate Constituency Election)
कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसने आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीनंतर आयोजित सभेत सतेज पाटील बोलत होते. एक मतदारसंघ काँग्रेसला द्या, उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी माझी असेल, या निमित्ताने विधानपरिषदेत काँग्रेसचा आणखी एक उमेदवार निवडून येईल आणि काँग्रेसचे संख्याबळ वाढेल, असा विश्वास सतेज पाटलांनी व्यक्त केला.
पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शिक्षक मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळावी, अशी सतेज पाटलांची मागणी आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांत असंतोष आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या कायद्याविरोधात पंजाबमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली होती. अशीच ट्रॅक्टर रॅली कोल्हापुरात काढण्यात आली.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नियोजनात निघालेल्या या ट्रॅक्टर रॅलीमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. सतेज पाटलांनी ट्रॅक्टरचं स्टिअरिंग स्वतःच्या हाती घेतलं असून मंत्री बाळासाहेब थोरात त्यांच्यासोबत बसल्याचे पाहायला मिळाले. (Congress Minister Satej Patil demands one seat for Teacher Graduate Constituency Election)
चंद्रकांत पाटलांना प्रतिआव्हान
कोल्हापुरातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा, मी पोटनिवडणुकीला उभा राहीन. या निवडणुकीत हरल्यास मी हिमालयात निघून जाईन, असे चंद्रकांत पाटील यांनी ठणकावून सांगितले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या आव्हानाला सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. आता या चर्चेला अर्थ नाही. कोल्हापुरातून लढण्याचा निर्णय तुम्ही 2019 मध्येच घ्यायला पाहिजे होता. आता ती संधी निघून गेली आहे, असे सतेज पाटील म्हणाले.
संबंधित बातम्या :
‘चंद्रकांतदादा आता संधी गेली, कोल्हापुरातून लढण्याचा निर्णय तेव्हाच घ्यायला पाहिजे होता’
(Congress Minister Satej Patil demands one seat for Teacher Graduate Constituency Election)