सातारा : काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना प्रतिउत्तर दिलं आहे. “आम्ही पिसाळलेली कुत्री आहोत हे बोलणं आपल्या सभापतीपदाला शोभत नाही. पिसाळलेले कुत्रे चावले तर या वयात इंजेक्शन सोसणार नाही”, अशी घणाघाती टीका जयकुमार गोरे यांनी केली.
रामराजे निंबाळकर यांनी माढ्याच्या पाण्यावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना, त्यांचा उल्लेख पिसाळलेली कुत्री असा केला होता. या टीकेला आमदार गोरे यांनी आज उत्तर दिलं.
“ज्या जनतेने रामराजेंना विधानसभेत पाठवलं, त्याकाळात मंत्रिपद असतानादेखील कालव्याचा प्रश्न मार्गी लागला नाही. बारामतीशी इमानदारीने चाकरी करायची म्हणून नीरा देवघरचं पाणी बारामतीकडे वळविले”, असं टीकास्त्र जयकुमार गोरे यांनी सोडलं.
हे पाणी दुष्काळी जनतेला जावं म्हणून आमचा प्रयत्न आहे. आम्ही पिसाळलेली कुत्री आहोत हे बोलणं आपल्या सभापतीपदाला शोभत नाही. पिसाळलेले कुत्रे चावले तर या वयात इंजेक्शन सोसणार नाही, असा टोला जयकुमार गोरेंनी रामराजेंना लगावला.
याशिवाय जयकुमार गोरे यांनी रामराजेंना सन्मानाने वयाचा विचार करून राजकारणातून निवृत्ती घेण्याचा सल्लाही दिला.
रामराजे निंबाळकर नेमकं काय म्हणाले होते?
“जिल्ह्यात जोपर्यंत तीन पिसाळलेली कुत्री आहेत, तोपर्यंत माझी भूमिका सुद्धा पिसाळलेलीच असेल.” असे म्हणत रामराजे निंबाळकरांनी उदयनराजे, रणजितसिंह आणि जयकुमार गोरेंवर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीटिंग बोलावली आहे. त्यात त्यांना सांगणार आहे, तुमच्या खासदाराला आवरा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत.” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी केली.
कोण आहेत जयकुमार गोरे?
संबंधित बातम्या
आता रामराजेंची जीभ घसरली, उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना
लोकसभेला भाजपचा प्रचार, तरीही जयकुमार गोरे काँग्रेसच्या प्रतोदपदी!
“माझा डीएनए तपासा, 96 पिढ्या नाईक निंबाळकरच निघतील, मात्र रामराजे बिनलग्नाची औलाद”
रामराजे लाचार, ‘बारामती’पुढे स्वाभिमान गहाण ठेवलाय : रणजितसिंह