कोल्हापूर : काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर मतदारसंघातील आमदार पी एन पाटील (Congress MLA P N Patil) हे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी पी एन पाटील यांच्यावर दबाव आणल्याचं सांगण्यात येत आहे. पी एन पाटील समर्थकांनी घेतलेल्या मेळाव्यात सामूदायिक राजीनामा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर आता आमदार पी एन पाटील (Congress MLA P N Patil) काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात कोल्हापुरातून काँग्रेसने सतेज पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. त्यामुळे पी एन पाटील समर्थक नाराज आहेत. पी एन पाटील समर्थकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी जाहीर केली होती. काँग्रेस पक्षासोबत तब्बल 40 वर्ष एकनिष्ठ राहूनही मंत्रिपद न मिळाल्याने पी. एन. पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
आमदार पी. एन. पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये एक तराजू दाखवण्यात आला होता. या तराजूच्या एका पारड्यात पैसे आणि दुसऱ्या पारड्यात 40 वर्षांची पक्षनिष्ठा दाखवण्यात आली होती. यामध्ये पैशाचं पारडं हे जड असल्याने ते झुकलेलं दाखवलं, तर पक्षनिष्ठतेचं वजन कमी असल्याचं दाखवण्यात आलं होतं. हा फोटो अनेक पी. एन. पाटील समर्थकांनी त्यांच्या सोशल मीडियावर स्टेटसला अपलोड केला होता. या प्रकारानंतर सतेज पाटील समर्थकांनीही सोशल मीडियातूनच पी एन पाटील समर्थकांना उत्तर दिलं होतं.
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने तीनही पक्षातील अनेक आमदार नाराज आहेत. काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी तर थेट पुणे काँग्रेस कार्यालयावर दगडफेक केली. हा प्रकार ताजा असताना तिकडे कोल्हापुरातील काँग्रेस आमदार नाराज असल्याचं चित्र आहे.
कोण आहेत पी एन पाटील?
संबंधित बातम्या
‘एकनिष्ठतेपेक्षा पैशांचं वजन अधिक’, कोल्हापुरात फोटो व्हायरल; पी एन पाटील गट नाराज