Satej Patil : राजेश क्षीरसागर यांच्या घरातील जेवणाचा खर्च मी का देऊ?; सतेज पाटील यांचा राऊतांना सवाल

| Updated on: Jul 16, 2022 | 4:48 PM

Satej Patil : आज माईक ओढत आहेत. उद्या पॅन्ट ओडून नागड करतील यांना. आज जे बंडाखोर आहेत त्यांना यापुढे राजकीय आयुष्य नाही. जाताना शिवसेना सोडली म्हणून सांगून जा. बाळासाहेब ठाकरे आमचे बाप. आमच्या बापाचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही.

Satej Patil : राजेश क्षीरसागर यांच्या घरातील जेवणाचा खर्च मी का देऊ?; सतेज पाटील यांचा राऊतांना सवाल
राजेश क्षीरसागर यांच्या घरातील जेवणाचा खर्च मी का देऊ?; सतेज पाटील यांचा राऊतांना सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर : शिवसेना नेते विनायक राऊत (vinayak raut) यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर (rajesh kshirsagar) यांच्यावर जाहीर मेळाव्यातून टीका केली होती. क्षीरसागर यांनी घरातल्या जेवणाचा खर्च दुसऱ्याकडून वसूल केल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला होता. त्यावर राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. ज्या सतेज पाटलांकडून या जेवणाचे पैसे घेतले असा उल्लेख राऊत यांनी केला, त्याच सतेज पाटलांना (satej patil) याबद्दल विचारा, असे क्षीरसागर यांनी म्हटले आहे. असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं स्पष्ट केलं. यावर सतेज पाटील यांनीही आज प्रतिक्रिया देताना राजेश क्षीरसागर यांच्या घरातील जेवणाचा खर्च मी का देऊ? असं म्हणत याला पूर्णविराम दिलाय. मात्र जाहीर सभेत विनायक राऊत नेमके जेवणाच्या खर्चावरून खरे बोलले की खोटे बोलले याची खुमासदार चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे.

विनायक राऊत यांनी टीका केल्यानंतर माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि राऊत यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे. पुढच्या वेळी निवडून येऊन दाखवा. जेवणाचे पैसे घेतले होते का? हे बंटी पाटलांनी सांगाव, असं सांगतानाच राऊतांसारखे नेते नेतृत्वाला डॅमेज करत असल्याचा आरोपही क्षीरसागर यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

राऊत काय म्हणाले?

विनायक राऊत काल कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी एक मेळावा घेऊन राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका केली होती. ज्यांना शिवसेने मोटं केलं. त्यांनीच हिंदुत्वाचा मुडदा पाडला याची मला खंत वाटते. एकनाथ शिंदे तुम्ही भाजपची लाचारी पत्करली आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. सत्तेसाठी लाचारी कशी असते हे तुम्ही दाखवून दिलं आहे, अशी टीका राऊत यांनी केली होती. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत बेईमानीची कीड मी सुद्धा अनुभवली आहे. घरी जेवायला बोलावून खर्च दुसऱ्याकडून वसूल करायचा ही क्षीरसागर यांची वृत्ती आहे. हे औटघटकेचं राज्य सहा महिने टिकले तरी नशीब, असा चिमटाही त्यांनी काढला होता.

आज माईक ओढत आहेत. उद्या पॅन्ट ओडून नागड करतील यांना. आज जे बंडाखोर आहेत त्यांना यापुढे राजकीय आयुष्य नाही. जाताना शिवसेना सोडली म्हणून सांगून जा. बाळासाहेब ठाकरे आमचे बाप. आमच्या बापाचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही आमदारकी विकून टाकली. भाजपच्या कपटनितीत तुम्ही सहभागी होतात. क्रूर राजकारण दिल्लीकर खेळत आहेत. त्यांच्या आसुरी आनंदाचे तुम्ही भागीदार होताय का? तुम्ही एकटे पडाल. पैसे संपल्यावर भीक मागत फिराल. पण उद्धव ठाकरे यांच्या मागे देश उभा आहे. कामाख्या देवीच्या पुजाऱ्याने काल निरोप पाठवला आहे. यांचे चार दिवस आहेत. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. देवीचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे, असं पुजाऱ्याने सांगितलं आहे, असं राऊत म्हणाले.