राहुल गांधी दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

मुंबई: सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. येत्या 11 एप्रिलपासून विदर्भातील सात जागांसाठी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवार विदर्भात प्रचार करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रचाराला आजपासून सुरुवात होणार आहे. यासाठी  स्वत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. आज संध्याकाळी 4 च्या सुमारास नागपूर इथे राहुल गांधी […]

राहुल गांधी दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
Follow us on

मुंबई: सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. येत्या 11 एप्रिलपासून विदर्भातील सात जागांसाठी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवार विदर्भात प्रचार करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रचाराला आजपासून सुरुवात होणार आहे. यासाठी  स्वत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. आज संध्याकाळी 4 च्या सुमारास नागपूर इथे राहुल गांधी यांची सभा पार पडणार आहे. राहुल गांधी दोन दिवस महाराष्ट्रात असतील.

सध्या सर्वत्र निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक उमेदवारांच्या प्रचारफेरी, सभांना सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात विदर्भात येत्या 11 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर 4 आणि 5 एप्रिलला राहुल गांधी महाराष्ट्र दौरा करणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात राहुल गांधी नागपूर, चंद्रपूर, पुणे आणि वर्धा येथे भेट देणार आहेत. त्याशिवाय उद्या 5 एप्रिलला त्यांची वर्ध्यात सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या मैदानावरच ही सभा होणार आहे. पहिल्या टप्प्यातील सात जागांसाठी काँग्रेसने या सभांचे आयोजन केलं आहे.

वर्ध्यात काँग्रेसकडून चारुलता टोकस तर भाजपाकडून विद्यमान खासदास रामदास तडस निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

2014 मध्ये निवडणुकीत काँग्रेसने विदर्भातील सर्व जागा गमावल्या होत्या. यंदाची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. गेल्या महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र दौरा केला होता.

राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा

4 एप्रिल – सायंकाळी 5 वा. नागपूर येथे जाहीर सभा

5 एप्रिल – सकाळी 11 वा. पुणे येथे विद्यार्थ्यांशी संवाद, लक्ष्मी लॉन मगरपट्टा सिटी

5 एप्रिल – दुपारी 2.30 चंद्रपूर येथे जाहीर सभा

5 एप्रिल – सायंकाळी 4.30 वा. वर्धा येथे जाहीर सभा

पाहा व्हिडीओ: