नवी मुंबई : हाथरसच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसने नवी मुंबईत सत्याग्रह आंदोलन केलं (Congress Protest In Lake At Navi Mumbai). हाथरस घटनेच्या निषेधार्थ सोमवारी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने जुईनगर येथील चिंचोली तलावात उतरुन आगळेवेगळे सत्याग्रह आंदोलन केले (Congress Protest In Lake At Navi Mumbai).
उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेनं मान खाली घालायला लावली. पण भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे आणि हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली. काँग्रेस पक्ष या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असून हाथरस घटनेच्या निषेधार्थ आज नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील जुईनगर येथील चिंचोली तलावात उतरुन आगळेवेगळे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
या सत्याग्रह आंदोलनात प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर, शेवंता मोरे, तुकाराम महाराज, इत्यादी सर्व सहभागी झाले होते. या आंदोलनात कॉंग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत स्थानिक रहिवाशांचे हाथरसच्या घटनेकडे लक्ष वेधून घेतले (Congress Protest In Lake At Navi Mumbai).
जुईनगरमधील पालिकेच्या चिंचोली तलावात उतरुन पाण्यामध्ये कॉंग्रेस प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन नवी मुंबईत चर्चेचा विषय बनले. तसेच, प्रदेश कॉंग्रेसकडूनही या आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे.
शिवसेना आमदाराच्या घरातच मराठा आंदोलकांचं ठिय्या आंदोलनhttps://t.co/XvHuzN422e #Shivsena #Maratha
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 5, 2020
Congress Protest In Lake At Navi Mumbai
संबंधित बातम्या :
दानवे किती रस्त्यावर असतात, हे माहीत आहे, बाळासाहेब थोरातांचा टोला