नवी दिल्ली : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी अशी मागणी नागपूर येथील अधिवसेशनात मांडण्यात आल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर दिशा सालियानची सीबीआय चौकशी झालेली असतांना एसआयटी चौकशी कशासाठी असा दावाही विरोधकांनी सभागृहात केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणात सीबीआय चौकशी झाली नाही अशी माहिती दिली होती. त्याच मुद्द्यावर नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोमवारी हक्कभंग आणणार असल्याचे म्हंटले आहे. दिशा सालियान प्रकरणात फडणवीस यांनी चुकीची माहिती दिली असा आरोप कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी केला आहे. दिल्ली येथे कॉँग्रेस कमिटीच्या बैठकीला नाना पटोले गेलेले असतांना त्यांनी हा आरोप केला आहे.
कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत थेट हक्कभंग आणणार असल्याचे म्हंटले आहे.
नाना पटोले यांनी केलेला हा दावा बघता सभागृहात चुकीचे माहिती दिली असल्यास हक्कभंगाची कारवाई होऊ शकते.
नाना पटोले हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिले होते, त्यामुळे पटोले यांचा दावा चर्चेचा विषय ठरत आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणात सभागृहात दिलेली माहिती खरी की खोटी याबाबत स्पष्टता येईलच, त्यामुळे पटोले यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
दिशा सालियान प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची होणार असल्याचे जाहीर केल्यानं आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.