मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी बीएमसी निवडणुकीत (BMC Elections 2022) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) म्हणून एकत्र लढण्याचे संकेत दिले असताना काँग्रेसमधूनच विरोधाचा सूर उमटला आहे. मुंबई महापालिकेचे विरोधीपक्ष नेते रवी राजा (Ravi Raja) यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे राज्यात हातात हात घालून असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना बीएमसी निवडणुकांना कशाप्रकारे सामोरे जाणार, याची उत्सुकता आहे. (Congress to fight BMC elections alone No alliance with Shiv Sena says Ravi Raja)
मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार. शिवसेनेसोबत युती करण्याची काहीही गरज नाही, असं वक्तव्य मुंबई महापालिकेचे विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी ‘एएनआय’शी बोलताना केलं आहे.
Congress to fight BMC elections alone. No need for an alliance with Shiv Sena: Ravi Raja, Congress leader, #Mumbai
— ANI (@ANI) November 19, 2020
काँग्रेसच्या महापालिकेतील गोटात काही अंशी शिवसेनेबद्दल नाराजीही आहे. आम्हाला शिवसेना विश्वासात घेत नाही म्हणून महापालिकेत राज्यासारखी महाविकास आघाडी होऊ शकली नाही, अशी नाराजी रवी राजा यांनी याआधीही बोलून दाखवली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायीसह इतर समिती निवडणुकात काँग्रेस सत्ताधारी सेनेविरोधात मैदानातही उतरली होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसने माघार घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार निवडून आले.
मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवू शकते. लवकरच एकत्र बैठक घेऊ. त्यामुळे साहजिकच आमच्या जागा वाढतील, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी आजच केला होता. त्यानंतर रवि राजांनी परस्पर विरोधी मत मांडत ट्विस्ट आणला आहे.
2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपने आतापासूनच शड्डू ठोकला आहे. भाजपने आधीच स्वबळाचा नारा दिला आहे. आता सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे हे इतर चार प्रमुख पक्ष कसे रिंगणात उतरणार, याची उत्सुकता आहे. (Congress to fight BMC elections alone No alliance with Shiv Sena says Ravi Raja)
मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल
संबंधित बातम्या :
बीएमसी निवडणूक भाजप स्वबळावर लढणार, मनसेबाबत विचार करु : प्रवीण दरेकर
(Congress to fight BMC elections alone No alliance with Shiv Sena says Ravi Raja)