मुंबई : विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाही राष्ट्रवादी वगळता मुख्य राजकीय पक्षांनी आपली उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. काँग्रेसच्या उमेदवार यादीचे (Congress Vidhansabha Candidate List Date) दोन मुहूर्त हुकल्यानंतर अखेर नवीन दिवस ठरला आहे. पितृपक्ष संपल्यानंतर काँग्रेस आपले उमेदवार घोषित करणार आहे.
नवरात्राचा शुभारंभ झाल्यानंतर काँग्रेस आपली पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पितृपक्षामुळे काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर करणं टाळल्याचं म्हटलं जातं. आधीच गळती लागल्यामुळे काँग्रेस आता शुभ-अशुभाचे शकुन मानत असल्याचं म्हटलं जात आहे.
काँग्रेस आपली पहिली यादी 20 सप्टेंबरला जाहीर करणार असल्याचं आधी म्हटलं जात होतं. त्यानंतर 21 तारखेला विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. त्यामुळे 23 सप्टेंबरला पहिली यादी जाहीर करण्याचा मुहूर्त ठरला, मात्र तोही अखेर लांबला. आता पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रात काँग्रेस उमेदवार जाहीर करु शकतं. म्हणजेच रविवार 29 सप्टेंबरनंतर काँग्रेसची पहिली यादी (Congress Vidhansabha Candidate List Date) समोर येईल.
विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी केली आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या आहेत, असं शरद पवार यांनी सांगितलं.
शरद पवारांनी बीडमधून पाच उमेदवार जाहीर केले आहेत, तर पुण्याचं जागावाटपाचं सूत्र अजित पवारांनी जाहीर केलं आहे. मात्र राष्ट्रवादी आपले उर्वरित 120 उमेदवार कधी जाहीर करणार हे समजलेलं नाही. जागावाटपाचं सूत्र ठरलेलं असलं, तरी काही जागांवर वाटाघाटीची शक्यता आहे.
काँग्रेसचं ‘सीटिंग गेटिंग’ तत्व
काँग्रेसच्या सीटिंग गेटिंग तत्वानुसार विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार हे निश्चित आहे. 2014 मध्ये काँग्रेसचे 42 आमदार निवडून आले होते. मात्र त्यापैकी अनेकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेषत: राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात काँग्रेस कुणाला उमेदवारी (Congress Vidhansabha Candidate List Date) देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
काँग्रेसची संभाव्य यादी
काँग्रेस संभाव्य उमेदवार यादी (Congress Vidhansabha Candidate List Date)
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या आघाडीबाबत अद्याप निश्चित झालेलं नाही. आतापर्यंत एमआयएम आणि आप या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी आठ-आठ उमेदवार घोषित केलेले आहेत. वंचितने मात्र आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत.
दुसरीकडे, शिवसेना आणि भाजप यांनीही युतीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. युतीचं घोडं जागावाटपावरुन अडल्याचं म्हटलं जात आहे. युतीच्या घोषणेनंतरच शिवसेना-भाजप आपले उमेदवार जाहीर करतील. मनसेनेही विधानसभा लढवण्याचं निश्चित केलं असलं, तरी त्यांची उमेदवार यादीही गुलदस्त्यात आहे.
महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर 21 सप्टेंबरला वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या. यासोबतच दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू झाली.
संबंधित बातम्या
Congress MLA List 2014 | महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांची संपूर्ण यादी
SHIVSENA MLA List 2014 | महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांची यादी 2014
BJP MLA List 2014 | महाराष्ट्रातील भाजप आमदारांची यादी 2014
NCP MLA List 2014 | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची यादी
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघ