… तर दिल्लीतले आकाह शिंदे-फडणवीस जोडीचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाहीत, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य!

| Updated on: Feb 25, 2023 | 4:18 PM

पुण्यातील पोट निवडणुकीत विजयी होण्यासाठी नेत्यांनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी यासंबंधीचे पुरावे माझ्याकडे असल्याचा दावाही केला आहे.

... तर दिल्लीतले आकाह शिंदे-फडणवीस जोडीचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाहीत, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य!
Image Credit source: social media
Follow us on

प्रदीप कापसे, पुणे | देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठी पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड पोट निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी ते वाट्टेल ते करू शकतात. या निवडणुकीत हरले तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जोडी शिल्लक राहणार नाही. दिल्लीतील आका यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे काहीही करा पण निवडणूक जिंका, अशी रणनीती त्यांनी अवलंबली आहे, असं वक्तव्य काग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. मात्र पुण्यातील पोट निवडणुकीत जनता आमच्याच बाजूने आहे, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

सफाईचं काम विदर्भातून सुरू…

विधान परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याचा दाखला विजय वडेट्टीवार यांनी दिला. ते म्हणाले, भाजपाचा सफाया होण्यास विदर्भातून सुरुवात झाली आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातही के दिसून येईल. आम्ही विधानपरिषदेच्या निवडणूकीत देवेंद्र फडणवीसांच्या गडात विजय मिळवला आहे . काँग्रेसमध्ये एकी नाही असं म्हणतात मग विजय मिळाला असता का ? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

कसब्यात भाजपविरुद्ध काँग्रेस

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ मतदार संघात पोट निवडणूक होत आहे. या ठिकाणी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपविरोधात महाविकास आघाडीने काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं आहे.

भाजपने पैसे वाटले-काँग्रेस

पुण्यातील पोट निवडणुकीत विजयी होण्यासाठी नेत्यांनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी यासंबंधीचे पुरावे माझ्याकडे असल्याचा दावाही केला आहे. पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी दाद दिली नाही. पोलिसांवरही दबाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

‘सत्तेसाठी स्वार्थीपणा’

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबतचं एक वक्तव्य आज तुफान चर्चेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा असल्यामुळे मी गद्दारी केली. त्यांना पाठिंबा दिला. ते मराठा नसते तर मी त्यांना साथ दिलीच नसती, असं गुलाबराव पाटील एका कार्यक्रमात बोललेत. यावरून राजकीय वर्तुळात त्यांच्यावर टीका होतेय. विजय वडेट्टीवार यांनीही गुलाबराव पाटील यांच्या बोलण्यावरून टीका केली. ते म्हणाले, ‘कोणत्या विचारानं मोठा होतो कोणाच्या भरवशानं मोठा होतो याला महत्व असतं. कोणत्या जातीचा कोण मोठा नेता याला महत्त्व नसते.. सत्तेसाठी हपापलेल्यांनी स्वार्थीपणा आणि नालायकपणा दाखवला आहे, अशा शब्दात वडेट्टीवर यांनी गुलाबराव पाटील यांना सुनावलंय.