Photo | पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणूक, कोरोना पॉझिटिव्ह मतदारांनी बजावला मतदानाचा अधिकार
Follow us on
राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान झालं. अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघात आज पार पडलेल्या निवडणुकीत पॉझिटिव्ह असलेल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
या ठिकाणी PPE किट घालून या कोरोना पॉझिटिव्ह मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
यवतमाळ शहरातील तहसील कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला होता. या ठिकाणी लक्षण नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना मतदान करण्यासाठी आणण्यात आले होते.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2020 सायंकाळी पाचपर्यंत 82.91 टक्के मतदान झाले. मतदानासाठी अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. अमरावतीमध्ये एकूण 35622 मतदार आहेत. त्यापैकी सर्वाधिक मतदार अमरावतीमध्ये आहेत. अमरावतीमध्ये प्रमुख लढत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांच्यामध्ये होत आहे.