ग्रामपंचायतीचा गुलाल कोण उधळणार?, मतमोजणीला सुरुवात

| Updated on: Oct 17, 2022 | 12:27 PM

रविवारी राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान झाले होते. त्यांचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

ग्रामपंचायतीचा गुलाल कोण उधळणार?, मतमोजणीला सुरुवात
Follow us on

मुंबई :  महत्त्वाची बातमी आहे. रविवारी राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) मतदान झाले होते. त्यांचा आज निकाल (Results) लागणार आहे. आज कोण बाजी मारणार? भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गट, ठाकरे गट की काँग्रेस याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावेळी 96 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती या भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या युतीला मिळाल्या आहेत. एकूण 96 बिनविरोध ग्रामपंचायतींपैकी 34 ग्रामपंचायती या भाजप आणि शिंदे गटाच्या वाट्याला आल्या. तर एकूण 15 ग्रामपंचायतींमध्ये ठाकरे गटाने बाजी मारली आहे. काँग्रेस 8, राष्ट्रवादी 17 आणि इतर 22 असं सध्याचं चित्र आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

मतमोजणीला सुरुवात

आज राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या  निवडणुकींचा निकाल लागणार आहे. रविवारी ग्रामपंचायत निवडणुकींसाठी मतदान झालं होतं. आज सकाळी दहा वाजल्यापासून मत मोजणीला सुरुवात झाली आहे. मत मोजणी केंद्रांबाहेर चोख बंदोबस्त तैनात करण्या आला आहे. ग्रामपंचायतीचा गुलाल कोण उधळणार? याची उत्सुकता निर्माण झाली असून, आता अवघ्या काही तासांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातील एकूण 96 ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

नाशिक जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

नाशिक जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. त्यापैकी सुरगाणाच्या उंबर पाडा दिंगरमध्ये स्थानिक विकास आघाडीचे चिमण पवार यांनी बाजी मारली आहे. तर नाशिकच्या वेळे ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे.  दरम्यान जवळपास सर्व पक्षांकडून आम्हीच निकालात बाजी मारणार असा दावा केला जात आहे. येत्या काही तासांत चित्र स्पष्ट होणार आहे.