मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लसीकरण मोहिमेवर भर दिला जातोय. अशावेळी लसींचा तुटवडा भासत असल्यामुळे लसीकरण मोहिमेत वारंवार खंड पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढलं. यामध्ये निविदा भरण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. यात सुरुवातीला फक्त 3 टेंडर आले होते. पण शेवटच्या एका तासात 5 टेंडर आले. हे 5 टेंडर बनावट असल्याचा दावा करत, मुंबई महापालिकेचा हा कोरोना लस घोटाळा असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय. (Corona vaccine scam in BMC, serious allegations of Kirit Somaiya)
मुंबई महापालिकेलं काढलेल्या ग्लोबल टेंडरची मुदत काल संपली आहे. त्यात सुरुवातीला फक्त 3 टेंडर आले होते. पण शेवटच्या एका तासांत 5 टेंडर आहे. हे 5 टेंडर बनावट आहेत. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कागदपत्रे देण्यात आली नाहीत. तसंच कागदपत्र देण्यासाठी मुंबई महापालिकेकडून 8 दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय. त्याचबरोबर गेल्या महिन्यात मुंबई महानगरपालिका आणि ठाकरे सरकारनं रेमडेसिव्हीर घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केलाय. महापालिकेनं रेमडेसिव्हीरसाठी प्रत्येकी 1 हजार 568 रुपयांची ऑर्डर काढली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्ष असलेल्या हाफकीनने 668 रुपयांची ऑर्डर काढली. त्यामुळे मुंबई महापालिकेत आता रेमडेसिव्हीर पाठोपाठ कोरोना लस घोटाळा होत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. दरम्यान, सोमय्या यांच्या आरोपांना आता सत्ताधारी शिवसेनेकडून काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मुंबई महापालिकेचा कोविड लस घोटाळा!
काल टेंडरची मुदत संपत होती, तर एका तासात 5 टेंडर आले!
हे 5 टेंडर बोगस आहेत, कोणतेही डॉक्युमेंटेशन नाही, तेच डॉक्युमेंट्स जोडण्यासाठी आता 8 दिवसांची मुदत वाढवली गेली
गेल्या महिन्यात मुंबई महानगरपालिका-ठाकरे सरकारने रेमडेसीवीर घोटाळा केला होता pic.twitter.com/18bNvVi9OD
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 26, 2021
कोरोना लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं जागतिक निविदा काढल्या. त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा करत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकावर जोरदार टीका केलीय. महाविकास आघाडी सरकारच्या जागतिक निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे सरकारच्या टक्केवारीच्या घोळात लसीकरण निविदा प्रक्रिया अडकली आहे का? अशी शंका सामान्य माणसाच्या मनात येऊ लागली आहे, असा टोला उपाध्ये यांनी लगावलाय.
अगोदरच टक्केवारी आणि वसुलीमुळे राज्य सरकार बदनाम झालेले असताना, लशीची जागतिक निविदादेखील टक्केवारीच्या घोळात गुरफटली आहे का? असा प्रश्नही त्यांनी केलाय. लस खरेदी प्रक्रिया नेमकी कशामुळे रखडली अडकली याचा राज्य तातडीने खुलासा करून सरकारने जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी मागणीही त्यांनी केलीय.
भाजपने पनवती म्हणून राणेंना अडगळीत टाकलं; विनायक राऊतांचा जहरी वारhttps://t.co/ydBVSqyPB7#vinayakraut | #shivsena | #narayanrane | #konkan | #CMUddhavThackeray | #bjp | #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 26, 2021
संबंधित बातम्या :
मुंबई महापालिकेची नालेसफाईची आकडेवारी खोटी; काँग्रेस आणणार शिवसेनेला अडचणीत
अजित पवार इन अॅक्शन; रुग्णालयांच्या फायर ऑडिटपासून म्युकोरमायकोसिस औषधांबाबत बैठकीत आढावा
Corona vaccine scam in BMC, serious allegations of Kirit Somaiya