CWC Meeting | सोनिया गांधीच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी राहणार, काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत निर्णय

| Updated on: Aug 24, 2020 | 6:25 PM

काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे.

CWC Meeting | सोनिया गांधीच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी राहणार, काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत निर्णय
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची (CWC) आज महत्त्वाची बैठक झाली (CWC Meeting). या बैठकीत सोनिया गांधीच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी राहणार असल्याचं निश्चित झालं. त्याचबरोबर पुढच्या सहा महिन्यात पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिची सूत्रांनी दिली आहे.

अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. ही बैठक सकाळी 11 वाजता पार सुरु झाली (CWC Meeting). या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, नारायण स्वामी, भुपेश बघेल, कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घ्यावी, अशी इच्छा व्यक्त केली. तर काहींनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष पद सोपवण्यात यावं अशी मागणी केली. मात्र, बैठकीत सोनिया गांधी पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांबाबत नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकमताने राहुल गांधी यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

पक्षाच्या पुनर्रचनेबाबत नेत्यांचं सोनिया गांधींना पत्र

काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचादेखील समावेश आहे.

काँग्रेसमध्ये अद्याप सोनिया गांधी यांच्या जागेवर कुणाला घेण्यात यावं याबाबत संभ्रम आहे. पत्रावर स्वाक्षरी केलेल्या काही नेत्यांच्या मते ते पत्रात लिहिलेल्या सर्व बाबींशी सहमत नाहीत. तरी, या पत्रातून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहे, ज्यावर विचार व्हायला हवा. मात्र, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी काँग्रेस परिवाराबाहेरील अध्यक्ष निवडण्यास विरोध दर्शवला आहे.

LIVE UPDATES :

  • सोनिया गांधीच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष राहणार<
  • राहुल गांधी म्हणाले, “आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली” , राजस्थान उच्च न्यायालयात आम्ही काँग्रेसला वाचवलं, मणिपूरमध्ये भाजपला खाली खेचलं, गेल्या 30 वर्षात भाजपच्या बाजूने एकही वक्तव्य केलं नाही, तरीही आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली, असं ट्विट कपिल सिब्बल यांनी केलं.

    Rahul Gandhi says “ we are colluding with BJP “

    Succeeded in Rajasthan High Court defending the Congress Party

    Defending party in Manipur to bring down BJP Govt.

    Last 30 years have never made a statement in favour of BJP on any issue

    Yet “ we are colluding with the BJP “!

    — Kapil Sibal (@KapilSibal) August 24, 2020

  • भाजपसोबत हातमिळवणी झाल्याचं सिद्ध झाल्यास सर्व पदं सोडेन, राहुल गांधींच्या आरोपानंतर कपिल सिब्बल संतप्त, बैठकीदरम्यान ट्विट करत नाराजी व्यक्त
  • राहुल गांधी यांनाच काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करणार. काँग्रेस पक्षाच्या कार्यकारीणीच्या बैठकीत एकमताने निर्णय, लवकरच राहुल गांधी यांच्या अध्यक्ष पदाची घोषणा करण्यात येणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती
  • 23 पत्रलेखक नेत्यांवर CWC च्या नेत्यांची टीका, या नेत्यांना उत्तर मागणार असल्याची माहिती
  • पत्र लिहिन्यासाठी हिच वेळ का निवडली, बैठकीत राहुल गांधींचा सवाल
  • मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, सोनिया गांधींची बैठकीत मागणी
  • 23 पत्रलेखक नेत्यांवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी नाराज
  • सोनिया गांधीची कार्यसमिती पुढे राजीनाम्याची ऑफर,  नवा अध्यक्ष निवडा, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची मागणी
  • काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी आपण अध्यक्ष व्हा, अशी विनवणी केली आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं अशी विनंती काँग्रेस शासित राज्याच्या सर्व मुख्यमंत्री यांनी केली आहे
  • राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं अशी मागणी काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीत करण्यात आली आहे.
  • सोनिया गांधी यांनी राजीनामा देऊ नये अशी विनंती बैठकीत केली आहे. बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुरु आहे.
  • काँग्रेस कार्यकारीणीची बैठक काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु, सोनिया गांधी आपला राजीनामा चा प्रस्ताव दिला.
  • कार्यकारीणीच्या बैठकीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, नारायण स्वामी, भुपेश बघेल, कॅप्टन अमरिंदर सिंह उपस्थित राहणार आहेत.
  • काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार
  • CWC Meeting : पक्षाच्या कार्यकारणीची आज बैठक, काँग्रेसची धुरा कोणाच्या हातात? काँग्रेस नेत्यांचं मत काय?https://t.co/Z2PXnJ2UHx#CongressPresident #SoniaGandhiResigns #RahulGandhi @bb_thorat @SunilKedar1111

अशोक गहलोत, कॅप्टन अमरिंदर सिंह, संजय निरुपम आणि डीके शिवकुमार सारख्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मात्र सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाला योग्य म्हटलं आहे.

सोनिया गांधी 14 मार्च 1998 पासून 16 डिसेंबर 2017 पर्यंत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राहुल गांधी यांनी दोन वर्ष अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र, गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या आग्रहानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.

CWC Meeting

संबंधित बातम्या :

CWC Meeting : पक्षाच्या कार्यकारणीची आज बैठक, काँग्रेसची धुरा कोणाच्या हातात? काँग्रेस नेत्यांचं मत काय?

महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, गांधी घराण्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सुनील केदारांकडून इशारा

…त्यानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावं : बाळासाहेब थोरात