नागपूर : जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर आता ऑगस्टमध्ये सरासरीएवढाच पाऊस बरसणार असल्याचा (Meteorological Department) हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, जुलैमध्ये तेच ऑगस्टमध्ये अशी अवस्था विदर्भात पाहवयास मिळत आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील (Crop Damage) पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण घरांचीही पडझड झाली आहे. यंदा पावसामुळे सर्वाधिक नुकसान हे विदर्भात झाले आहे. रामटेकचे शिवसेना (Krupal Tumane) खा. कृपाल तुमाने यांनी नागपूर जिल्ह्यातील पीक नुकसानीची तर पाहणी केलीच शिवाय पडझड झालेल्या घरांचीही पाहणी करीत ग्रामस्थांनी मदतीचे आश्वासन दिले. एकीकडे शिंदे गटाचे आमदार नुकसान झालेल्या भागाची पाहणी करीत आहेत तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार आता ग्रामस्थांच्या मदतीला धावून येऊ लागल्याचे चित्र विदर्भात आहे. तुमाने यांनी कुही तालुक्यातील वेलतूर, पांडेगाव, सिल्ली, टेकेपार, मुरंबी या गावांचा दौरा केला.
विदर्भात खरीप हंगामात भाताची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदाही सरासरी क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. मात्र, सततच्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे तर याचा उत्पादनावर परिणाम होईल अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहे. नुकसान भरपाईची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली असली तरी त्याची त्वरीत अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. विदर्भात केवळ धान पीक, सोयाबीन आणि कापसाचेच नुकसान झाले असे नाहीतर घरांचीही मोठी पडझड झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे तुमाने यांनी सांगितले आहे.
खरीप हंगामातील पेरणी झाल्यापासू पिके पाण्यात आहेत. पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून आता उत्पादनाच्याही आशा मावळल्या आहेत. विदर्भात 1 लाख 35 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकासन झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे नागपूर विभागात झाले आहे. नागपूर विभागातील गडचीरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात अतिृष्टीचा मोठा फटका बसलाय. धान, कापूस, तूर, सोयाबीन यासह भाजीपाला आणि फळबागा ह्या पाण्यात आहेत. सध्या जिरायती क्षेत्रातील नुकसानभरपाईची घोषणा झाली आहे. फळबागायत दारांबाबतत अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही.
रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांनी कुही तालुक्यातील पीक नुकसानीची तर पाहणी केलीच शिवाय अधिकच्या पावसामुळे ज्या घरांची पडझड झाली तिथेही तुमाने पोहचले होते. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला शिवाय नुकसानभरपाई मिळून देणार असल्याचेही तुमाने यांनी सांगितले आहे. शेती नुकसानीबाबत राज्य सरकराने निर्णय घेतला असला तरी घरांच्या पडझडीचे काय असा सवालही तुमाने यांनी उपस्थित केला आहे.