राजकारणातल्या दोन सख्ख्या मित्रांची कहाणी, दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात गडकरींचं नाव, मित्रत्व असावं तर असं!

| Updated on: Oct 19, 2021 | 3:44 PM

देशात आणि महाराष्ट्रात अशी बरीच राजकारणविरहित मैत्रीची उदाहरणं देता येतील. अशीच मैत्री आहे एकेकाळचे काँग्रेस नेते माजी खासदार दत्ता मेघे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...! यांच्या मैत्रीबद्दल सांगायचं कारण म्हणजे दत्ता मेघे यांच्या मृत्यूपत्रात चक्क नितीन गडकरी यांचं नाव आहे. खुद्द दत्ता मेघे यांनीच याबद्दलची माहिती एका कार्यक्रमात दिली.

राजकारणातल्या दोन सख्ख्या मित्रांची कहाणी, दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात गडकरींचं नाव, मित्रत्व असावं तर असं!
दत्ता मेघे आणि नितीन गडकरी
Follow us on

वर्धा: राजकारणात सध्या एकमेकांबद्दलचा आदर, सन्मान, मोठेपणा हे शब्द परावलीचे झाले आहेत. सध्या एकमेकांवरची चिखलफेक एवढी वाढली आहे की राजकारण चांगलं आहे, असं म्हणणंही चुकीचं ठरेल की काय अशी शंका येते. पण ऐंशी नव्वदच्या दशकातलं राजकारण वेगळं होतं. एकमेकांबद्दल आदर सन्मान ठेवला जायचा, भलेही मग तो विरोधी पक्षातला का असेना. देशात आणि महाराष्ट्रात अशी बरीच राजकारणविरहित मैत्रीची उदाहरणं देता येतील. अशीच मैत्री आहे एकेकाळचे काँग्रेस नेते माजी खासदार पण सध्या भाजपत असलेले दत्ता मेघे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…! यांच्या मैत्रीबद्दल सांगायचं कारण म्हणजे दत्ता मेघे यांच्या मृत्यूपत्रात चक्क नितीन गडकरी यांचं नाव आहे. खुद्द दत्ता मेघे यांनीच याबद्दलची माहिती एका कार्यक्रमात दिली.

दत्ता मेघेंनी गुपित फोडलं

राजकारणात अनेक व्यक्ती नात्यापलीकडच्या असतात. त्यांच्यावर प्रचंड विश्वास असतो. ही बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दत्ता मेघे यांच्या बाबतीत दिसते. मृत्युपत्रात कुठं काही घोळ होऊ नये, कसलीही अडचण येऊ नये याकरिता दत्ता मेघे यांच्या मृत्युपत्रात नितीन गडकरी यांचं नाव लिहिलं असल्याचं गुपित खुद्द माजी खासदार दत्ता मेघे यांनीच जाहीररीत्या उघड केलं.

मृत्यूपत्रात गडबड होऊ नये म्हणून गडकरींचं नाव : दत्ता मेघे

वर्ध्याच्या नगरपालिकेत विकासकामाचं इ भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे आदी उपस्थित होते. सर्व पक्षांशी मी चांगले संबंध प्रस्थापित केले. नितीनजी आमच्या फॅमिलीचे महत्वाचे मेंबर आहेत. मी माझ्या मृत्युपत्रात काही घोळ होऊ नये म्हणून त्यांचं नाव दिलं आहे, असं खुद्द दत्ता मेघे यांनी सांगितलंय. यावेळी गडकरी यांच्याहस्ते देशभरात सुरू असलेल्या विकासकामाचं त्यांनी कौतुक केलं.

कोण आहेत दत्ता मेघे?

दत्ता मेघे हे राज्यातले अतिशय ज्येष्ठ नेते आहेत.
दत्ता मेघे काँग्रेसच्या तिकीटावर चार वेळा लोकसभेवर निवडून गेले
काँग्रेसच्याच तिकीटावर ते राज्यसभेवर गेले
नंतर भाजपचं सरकार आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

(Datta meghe testament Name included Union Minister Nitin Gadkari)

हे ही वाचा :

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक निर्णय, 40 टक्के तिकिटं महिलांना देणार, प्रियंकाचा नारा, लडकी हुँ लड सकती हुँ !

‘मिशन कवचकुंडल’ अभियान दिवाळीपर्यंत चालू राहणार, लसीकरणाचा वेग वाढवणार- आरोग्यमंत्री