Breaking | मुख्यमंत्री पदावरून नेमकं कुठे बिनसलं? 8 दिवसांत गौप्यस्फोट, दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jan 27, 2023 | 4:17 PM

शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून नेमकं काय झालं, यासंदर्भात लवकरच आठवडाभरात मी गौप्यस्फोट करणार आहे, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलंय.

Breaking | मुख्यमंत्री पदावरून नेमकं कुठे बिनसलं? 8 दिवसांत गौप्यस्फोट, दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य
Image Credit source: social media
Follow us on

प्रदीप कापसे, पुणे: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी खुर्चीचा मोह कधी धरला नाही, मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संधी येताच मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) पद बळकावले असा आरोप नेहमीच दबक्या आवाजात करण्यात येतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद होण्याचं हेच मुख्य कारण असल्याचंही बोललं जातं. शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून नेमकं काय बिनसलं, यासंदर्भात लवकरच पक्की माहिती समोर येणार आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यासंदर्भात वक्तव्य केलंय. येत्या ८ दिवसात याविषयी गौप्यस्फोट करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

पुण्यात टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना दीपक केसरकर यांनी हे वक्तव्य केलंय. ते म्हणाले, शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून नेमकं काय झालं, यासंदर्भात लवकरच आठवडाभरात मी गौप्यस्फोट करणार आहे. मी उद्धव ठाकरे यांचा मान राखतो, मात्र ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वारंवार जे आरोप होतायत, त्यानंतर आता बोललंच पाहिजे…

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डाव्होस दौऱ्यावर टीका केली आहे. तसेच शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आमदारांवरही घणाघाती आरोप केलेत. यावरून दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. आदित्य ठाकरे ज्या पद्धतीने बोलतात तो गैरसमज निर्माण होतोय, त्यामुळे येत्या आठवडाभरात मी स्पष्ट बोलणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय.

प्रकाश आंबेडकरांबद्दल काय म्हणाले?

दीपक केसरकर यांनी प्रकाश आंबेडकरांबद्दलही मोठं वक्तव्य केलंय. ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची नुकतीच युती जाहीर झाली आहे. त्यावरून दीपक केसरकर म्हणाले, प्रकाश आंबेडकरांचा मी नेहमी आदर करतो. मात्र सरकार चालवताना आम्ही प्रकाश आंबेडकरांच मार्गदर्शन घेत असतो. ठाकरे आणि वंचितच्या युतीचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही.

आता बोललंच पाहिजे…

उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेवर सत्ता हवी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विषयांवर ते बोलत नाहीत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. मात्र आतापर्यंत मुंबईवर भाजपा आणि शिवसेना युतीचाच भगवा फडकणार असल्याचं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलंय.