सिंधुदुर्ग : कोकणात आता खऱ्या अर्थाने राजकीय धुमशान सुरु झालं आहे (Kokan Assembly Elections). जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात (Sawantwadi Constituency) यावेळी भाजपकडूनच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपचे राज्य चिटणीस राजन तेली यांनी दीपक केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे (Deepak Kesarkar vs Rajan Teli). यावेळी दीपक केसरकर यांचा पराभव अटळ आहे आणि त्यासाठीच मी रिंगणात उतरलो आहे, असा दावा राजन तेली यांनी केला.
नारायण राणे यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लावणाऱ्या दीपक केसरकर यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सध्या भाजपकडून सुरू आहेत (Deepak Kesarkar vs Rajan Teli). दीपक केसरकर यांची ही तीसरी टर्म आहे. सावंतवाडी मतदारसंघात दोनदा विजयी झालेला उमेदवार तीसऱ्यांदा विजयी होऊ शकलेला नाही, असा सावंतवाडीचा इतिहास आहे आणि हाच इतिहास पुसण्याचा प्रयत्न दीपक केसरकर यांच्याकडून सुरु आहे(Deepak Kesarkar vs Rajan Teli). मात्र, शिवसेनेचा मित्र पक्ष भाजपनेच यावेळी केसरकर यांच्या पराभवाचा विडा उचलल्याचं चित्र आहे.
त्यासाठी राजन तेली हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा तयारीत आहेत. याबाबत राजन तेली यांनी जाहीरही केलं.
मोडकळीस आलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही राजन तेली यांना मदत करण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर एकेकाळी केसरकर यांचा उजवाहात समजले जाणारे बबन साळगावकर यांनीही यावेळी दीपक केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचं जाहीर केलं.
हेही वाचा : हॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला
गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्यावेळी नारायण राणेंसह विरोधकांना धोबीपछाड दिला. त्यामुळे यंदा राणेंच्या निशाण्यावरही दीपक केसरकर आहेत. त्यामुळे सध्या सावंतवाडी मतदारसंघातील राजकारण तापलेलं दिसत आहे. आता दीपक केसरकर इतिहास पुसणार की, राजन तेली त्यांना पराभूत करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.