Manish Sisodia | भ्रष्टाचाराचा मुद्दाच नाही, अरविंद केजरीवाल ही पंतप्रधान मोदींची खरी अडचण, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचे थेट आरोप, 10 मुद्दे महत्त्वाचे!

| Updated on: Aug 20, 2022 | 12:59 PM

अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्ससारखी वृत्तपत्रे दिल्लीतील कामाची दखल घेतात पण केंद्र सरकारतर्फे येथील राज्यकर्त्यांना त्रास दिला जातो, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल केला होता. आज उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली.

Manish Sisodia | भ्रष्टाचाराचा मुद्दाच नाही, अरविंद केजरीवाल ही पंतप्रधान मोदींची खरी अडचण, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचे थेट आरोप, 10 मुद्दे महत्त्वाचे!
मनिष सिसोदिया, उपमुख्यमंत्री दिल्ली
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्लीः दिल्लीत शिक्षण आणि इतर विभागांमधील चांगलं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आवडत नाही. त्यामुळेच ते रोखलं जातंय. दिल्लीत केजरीवाल (Arvind Kejariwal) आरोग्य आणि शिक्षणात जे काम करतायत, त्याचा तर मोदींनाही  गर्व वाटला पाहिजे, मोदी अरबपती मित्रांसाठी काम करतात. देशानं त्यांना एवढं बहुमत दिलं पण अशा प्रकारे चांगलं काम रोखणं त्यांना शोभत नाही, असं वक्तव्य दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी केलं. उत्पादन शुक्ल प्रकरणी सीबीआयने शुक्रवारी मनीष सिसोदिया यांचे राहते घर आणि इतर 30 ठिकाणी धाडी टाकल्या. त्यामुळे आम आदमी पार्टी आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्ससारखी वृत्तपत्रे दिल्लीतील कामाची दखल घेतात पण केंद्र सरकारतर्फे येथील राज्यकर्त्यांना त्रास दिला जातो, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल केला होता. आज उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली. या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे

  1. अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्समध्ये दोन बातम्या आल्या आहेत. एक बातमी नवी दिल्लीच्या शिक्षण प्रणालीच कौतुक करणारी आहे तर तर दीड वर्षांपूर्वी एक बातमी कोविड काळात गंगा नदीत कशा पद्धतीने लाखो प्रेतांचा ढीग लागला होता.. याची बातमी आहे. भारतीय म्हणून आम्हाला शरम वाटली होती. पण दिल्लीच्या शिक्षणाच्या मॉडेलचं कौतुक केल्यानंतर आमच्यासाठी ही गर्वाची बातमी आहे.
  2.  वरिष्ठांच्या आदेशानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी माझ्या घरावर धाडी टाकल्या. पण त्यांनी माझ्याशी योग्य वर्तणूक ठेवल्यामुळे अधिकाऱ्यांचा मी आभारी आहे.
  3.  ज्या उत्पादन शुल्क धोरणामुळे हा वाद सुरु आहे. पण माझ्या मते, दिल्लीतील एक्साईज पॉलिसी ही देशातील सर्वोत्कृष्ट पॉलिसी आहे. यात खूप पारदर्शकता आहे. ३८ तासांपूर्वी ही पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय झाला नसता तर दिल्ली सरकारला यातून 10 हजार कोटी रुपये वार्षिक उत्पन्न मिळालं असतं.
  4.  भाजपचे नेते वेगवेगळे आकडे देऊन घोटाळा झाला म्हणतात. मनोज तिवारी म्हणाले, 8 हजार कोटींचा घोटाळा झाला… नंतर म्हणाले 1100 हजार कोटींचा.. नंतर 144 कोटींचा घोटाळा म्हणाले… मात्र CBI FIR कॉपीमध्ये सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, एक कोटी रुपयांचा घोटाळा झालाय असं नमूद आहे, पण यात काहीच घोटाळा नाहीये..
  5.  मुद्दा उत्पादन शुल्काचा नाहीये. गुजरातमध्ये दरवर्षी 10 हजार कोटी एक्ससाईज ड्युटीची चोरी केली जाते , तिथं CBI ला पाठवलं जात नाही…
  6.  काही दिवसांपूर्वी बुंदेलखंड हायवे मोदींनी उदघाटन झालं.. देशाने हे दाखवलं. पण पाच दिवसांच्या आतच हा रस्ता खचला, मग यात घोटाळा नाही का? त्याबाबत कारवाई का केली जात नाही, असा सवाल सिसोदियांनी केला.
  7.  अरविंद केजरीवाल ही त्यांची अडचण आहे. काम करणारे प्रामाणिक नेते, अशी त्यांची ओळख बनतेय. हे त्यांना खरटत आहे. पंजाबनंतर संपूर्ण देशात अरविंद केजरीवालांकडे राष्ट्रीय पर्याय म्हणून पाहिले जात आहे. यामुळेच माझ्याविरोधात कारवाई सुरु आहे.. असं सिसोदिया म्हणाले.
  8.  पंतप्रधान मोदींना देशाने इतक मोठा बहुमत दिलं, त्यामुळे मोदींना हे शोभत नाही, अशी खंत सिसोदियांनी व्यक्त केली.
  9.  मोदींना कुणी चांगलं काम करताना दिसलं तर त्यांना रोखलं जातं.. मुख्यमंत्री केजरीवाल आरोग्य आणि शिक्षणात जे काम करत आहेत, त्याचा मोदींनाही गर्व वाटला पाहिजेत.. मोदी हे काही अरबपती मित्रांसाठी काम करतात, केजरीवाल हे 24 तास देशाचा विचार करून काम करतात, असं सिसोदिया म्हणाले.
  10. 2024 ची निवडणूक ही आता आप विरुद्ध भाजप अशी असणार आहे, असा इशारा मनीष सिसोदिया यांनी दिला.