Delhi Exit Poll : दिल्लीत कुणाचं सरकार? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी

| Updated on: Feb 08, 2020 | 7:56 PM

दिल्लीमध्ये आज (8 फेब्रुवारी) 70 विधानसभा जागांसाठी मतदान झालं. सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झालेलं मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु होतं.

Delhi Exit Poll : दिल्लीत कुणाचं सरकार? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये आज (8 फेब्रुवारी) 70 विधानसभा जागांसाठी मतदान झालं. सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झालेलं मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु होतं (Delhi Exit Poll 2020). विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीत 13 हजार 571 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 54 टक्के मतदान झालं आहे. अंतिम आकडेवारी येणं अद्याप बाकी आहे. हा आकडा 57 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आता दिल्लीत कुणाचं सरकार येणार याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. याचा अंदाज दर्शवणारे अनेक एक्झिट पोलही आता समोर आले आहेत.

टीवी 9 मराठीने केलेल्या विश्वसनीय सिसेरो एक्झिट पोलमध्ये दिल्लीत तिसऱ्यांदा आम आदमी पक्षाचंच सरकार येणार असल्याचं दिसत आहे. टीव्ही 9 ने दिल्लीतील 70 विधानसभा मतदारसंघातील हजारो मतदारांशी बोलून हा एक्झिट पोल केला आहे. दिल्लीत एकूण 210 ठिकाणी मतदारांशी संवाद करण्यात आला. यात 10 हजारहून अधिक मतदारांनी सहभाग घेतला. महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ मतदार अशा विविध मतदारांचा यात समावेश होता. यावेळी हिंदू-मुस्लिम आणि शिख मतदारांनाही प्रश्न विचारण्यात आले.

टीव्ही 9 सिसेरो एक्झिट पोल

पक्षजागा
आप54
भाजप15
काँग्रेस01
इतर00

टाईम्स नाऊ एक्झिट पोल

पक्षजागा
आप44
भाजप26
काँग्रेस00
इतर00

रिपब्लिक जन की बात एक्झिट पोल

पक्षजागा
आप48
भाजप09
काँग्रेस01
इतर00

एकूणच सर्वच एक्झिट पोल दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आपला कमी-अधिक जागा देत असले, तरी या सर्वांमध्ये पुन्हा एकदा आपचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट होत आहे. आता मतदारांचा खरा कौल काय हे मतदान मोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

संबंधित व्हिडीओ :


Delhi Exit Poll 2020