देवेंद्र फडणवीसही भिजले, भर पावसात भाषण; मुंबई हल्ल्यातील शहिदांना दिली श्रद्धांजली

| Updated on: Nov 26, 2023 | 7:49 PM

अमृता फडणवीस यांच्या पुढाकाराने गेटवे ऑफ इंडिया येथे ग्लोबल पीस ऑनर्सने कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मुंबईवरील हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक पावसाने हजेरी लावली. पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. भाषण थांबवलं नाही.

देवेंद्र फडणवीसही भिजले, भर पावसात भाषण; मुंबई हल्ल्यातील शहिदांना दिली श्रद्धांजली
Devendra Fadnavis
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : मुंबईवरील हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करत असतानाच अचानक पावसाने हजेरी लावली. गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, पाऊस सुरु असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी भाषण सुरूच ठेवलं. भर पावसात त्यांनी भाषण करत 26/11 च्या शहिदांना आदरांजली वाहिली आहे.

अमृता फडणवीस यांच्या पुढाकाराने ग्लोबल पीस ऑनर्सने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गेटवे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते. यावेळी 26/11तील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. फडणवीस भाषण करत असतानाच अचानक वरुणराजाने हजेरी लावली. भर पावसातही देवेंद्र फडणवीस यांनी आपलं भाषण थांबवलं नाही. फडणवीस यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. विशेष म्हणजे सर्वच मान्यवर या भर पावसात उभे होते. यावेळी श्री श्री रविशंकर यांचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री श्री रविशंकर यांचा सत्कार करण्यात आला.

मुंबईत पावसाने दाणादाण

दरम्यान, मुंबईतील विविध भागात संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसाला सुरवात झाली. दादर, माटुंगा, सायन. फोर्ट परिसरात पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अवेळी आलेल्या पावसाने सर्वांचीच गोची केली. मुंबईच नव्हे तर ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आणि कल्याण परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

हॉटेल ताजमध्ये सामंजस्य करार

दरम्यान, त्यापूर्वी हॉटेल ताजमध्ये एक कार्यक्रम पार पडला. जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यास गती देण्याकरिता राज्य शासनातर्फे आज व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यात चांगले यश मिळाले. आज हा सामंजस्य करणारा करून जलयुक्त शिवराच्या कामाला नैसर्गिक व सेंद्रिय शेतीची जोड देऊ शकलो ही मोठी गोष्ट आहे. मिशन मोडवर आम्ही जलयुक्त शिवार 2 टप्पा राबविणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.