मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी पडल्याचे वृत्त समोर येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांना चांगलच झापलं आहे. मंत्रिमंडळ बैठकी दरम्यान हा प्रकार घडला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत कृषीमंत्री सत्तारांना चांगलच खडसावलं आहे.
मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तारांना सुनावलं आहे. योजनेची घोषणा होण्याआधीच वृत्त उघड झाल्याने फडणवीस यांनी थेट बैठकीत नाराजी व्यक्त केली.
सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच सुनावल्याचे समोर आले आहे.
अब्दुल सत्तार यांनी राज्य सरकारच्या काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत परस्पर जाहीर वक्तव्य केल्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस चांगलेच संतापले. थेट मंत्रीमंडळ बैठकीत फडणवीस यांनी सत्तार यांना खडसावले.
यापुढे कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका अशी सक्त ताकीदच फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना दिली आहे. फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मंत्र्यांना समज दिल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्र सरकारची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना देशात लागू आहे. या योजने प्रमाणेच राज्यातही नवीन सन्मान योजना सुरु करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे.
ही योजना अंमलात आणण्याबाबत शिंदे- फडणवीस सरकारमधील मंत्री अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. मात्र, या योजनेबाबत अद्याप काही ठरले नसताना ही माहिती प्रसारमाध्यमांमध्ये लिक झाली.
सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची गंभीर्याने दखल घेतली आणि थेट मंत्रिमंडळ बैठकीतच हा मुद्दा मांडला. फडणवीसांनी कृषीमंत्रीसत्तार यांना धारेवर धरत ही माहिती फोडल्याबद्दल जाब विचारला.
शेतकरी सन्मान योजनेबाबत कोणताही निर्णय झालेला नसताना तुम्ही ही माहिती जाहीर कशी केली? असा सवालच फडणवीस यांनी विचारला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही सत्तार यांना यावर उत्तर देण्यास सांगितले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी धारेवर धरल्यानंतर सत्तार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपण निर्णय झाल्याचे माध्यमांना म्हणालो नाही, तर विचार सुरू असल्याचेच सांगितले, असे सत्तार यांनी सांगीतले.