उद्यापासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. हे अधिवेशन संपूर्णपणे चार आठवडे चालणार आहे. विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकलेला असला तरी त्यांनी आमच्या सोबत राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी त्याला योग्य उत्तर देण्यात येईल परंतू सूड भावनेतून उगाच टॉलरेट केले त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला जाहीर केले आहे.
राज्यातील जनतेने आम्हाला लॅण्ड स्लाईडने व्हीक्टरी दिली आहे. आमच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा म्हणून करु नये. आता तर विरोधी पक्ष नेता देखील होऊ शकत नाही एवढं जनतेने त्यांचं चांगलं केले आहे असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांना हाणाला आहे. यावेळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. आम्हाला २३७ आमदार मिळाले आहे.लॅण्ड स्लाईड हुरुळून जाणारे नाही हवा डोक्यात जाणार नाही, विरोधकांनी देखील जबाबदारी महाराष्ट्राचे प्रश्न मांडावे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे, गेल्या अधिवेशनात विरोधक सभागृहात कमी आणि पायऱ्यावर जास्त असतात असाही टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी बंद केलेले प्रकल्प सुरु केले, देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्तआवार शिवार योजना, आपण मुख्यमंत्री असताना सुरु केल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आम्ही सिंचन १४३ सिंचन प्रकल्पांना गेल्या अडीच वर्षात पू्र्ण केले, लाडक्या बहिण सारखी योजना आणली. आता फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वेग विकासाचा वेग आणखी वाढवणार, हाच आमचा अजेंडा पुढे नेणार आहोत असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
यंदाच्या अर्थसंकल्पात त्याचे राज्याच्या विकासाचे प्रतिबिंब त्यात दिसेल दुप्पट क्षमतेने चौपट वेगाने काम करु असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. मीडियावाले दररोज बातम्या देत असतात त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करीत काम करत आहोत. म्हणजे पत्रकारांकडे नव्हे तर विरोधकांकडे आम्ही लक्ष देत नाही. विरोधक म्हणाले की सुप्रिम कोर्ट आणि ईव्हीएमने हरवले आहे. निवडूक जिंकली तर ईव्हीएम चांगले आणि हरली तर ईव्हीएमला दोष असा सर्व प्रकार आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
चहापानावर कायम बहिष्कार टाकला जात आहे. विरोधकांच्या सर्व आरोपांवर सरकार उत्तर देण्यास समर्थ आहे. सूड भावनेतून तर टॉलरेट केले तर त्याच पद्धतीने उत्तर दिले जाई. तेच तेच रड गाणं गाण्यापेक्षा, आमच्या सोबत यावं विकासाचं गाणं गावं. विरोधक आणि सत्ताधारी अशी रथाचे दोन चाक आहे. ईव्हीएम आणि निवडूक आयोग आणि सुप्रिम कोर्टात न ऐकल्याने आम्ही जनतेत जाऊ असे विरोधक म्हणाले. जनतेच्या दरबारात आम्ही गेलो आणि खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी जनतेने दाखविली असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
ज्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही, त्यांच्या बातम्या तुम्ही कशा छापता. तुम्ही किती ब्रेकींग बातम्या दिल्यातर आमच्यात ब्रेकींग होणार नाही. म्हणे कोल्ड वॉर सुरु आहे. कसलं कोल्ड वॉर, सगळं कसं थंडा कूल कूल आहे. महाविकास आघाडी महायुतीत हाच एक मोठा फरक आहे. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही. जनतेच्यासाठी विकासासाठी आम्ही एकत्र आहोत. हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. आम्हाला ऋृणातून उतराई व्हायचं आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधकांची संख्या कमी कमी होत चालली आहे. आता कुठपर्यंत आलीय ते पाहावं आणि त्यांनी आता आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण करावे असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.