जालना : विकास निधी वाटपावरुन नाराज झालेले काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समजूत काढली. जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल यांनी उगारलेले उपोषणाचे अस्त्रही म्यान केले आहे. (Deputy CM Ajit Pawar consoles Disappointed Congress Jalna MLA Kailash Gorantyal)
जालन्यात विकास निधीच्या वाटपावरुन काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल नाराज झाले होते. आधीच महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या चर्चा रंगल्या असताना गोरंट्याल यांनीही उपोषणाचा इशारा दिला. त्यामुळे अजित पवार यांनी गोरंट्याल यांची समजूत काढली.
शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि अंबेकर यांना दिलेला निधी मार्च महिन्याच्या पूर्वीचा होता. आपण उपोषण करु नये, असे अजित पवार यांनी गोरंट्याल यांना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठीही गोरंट्याल अजित पवारांना घेऊन जाणार असल्याची चर्चा होती.
हेही वाचा : काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन गटबाजी, दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत घमासान, कोण कुणाच्या बाजूने?
“अजित पवारांचा काल दुपारी 3.40 वाजता फोन आला होता. तुमची नाराजी मी दूर करणार असल्याचे ते म्हणाले. निधी 31 मार्चच्या आधीचे होते. येणारा नवीन फंड आम्ही तुमच्या नगरपालिकेला देणार आहोत” असे अजित पवार यांनी सांगितल्याची माहिती काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.
“दादा, तुमच्यावर आमचा भरोसा आहे, असे मी म्हणालो. उपोषणही मी मागे घेतले. बाकीच्या आमदारांचीही नाराजी नाही. अजितदादांनी स्वतः गॅरंटी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आज भेट नाही, मात्र अधिवेशनात मुख्यमंत्री भेटतील” असेही गोरंट्याल म्हणाले. (Deputy CM Ajit Pawar consoles Disappointed Congress Jalna MLA Kailash Gorantyal)
VIDEO : SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 25 ऑगस्टhttps://t.co/NkX4l7IdLc
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 25, 2020
संबंधित बातम्या :
(Deputy CM Ajit Pawar consoles Disappointed Congress Jalna MLA Kailash Gorantyal)